विश्वास बसणार नाही, शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळींना इतका पगार द्यायचे !

छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होण्यापूर्वीच्या काळात वतनदारी पद्धत अस्तित्वात होती. परकीय सत्ताधीशांच्या राज्याचे संरक्षण, लढाया किंवा राज्यविस्तारासाठी आपली लष्करी ताकत वापरण्याच्या अटीवर परकीय सत्ताधीश सरदारांना वतने देत. यामध्ये बहुतांश वेळा मर्जीतल्या किंवा नातेवाईकांनाच वतनदारी मिळायची. त्याबदल्यात वतनदारांना आपल्या वतनांत महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले जायचे. पुढे ही वतनदारी व्यवस्था वंशपरंपरागत बनली. यामुळे वतनदार मग्रूर बनले आणि त्यांनी महसुलासाठी रयतेवर जुलुमजबरदस्ती सुरु केली.

छत्रपती शिवरायांनी वतनदारी बंद करून वेतनदारी चालू केली !

शिवरायांचा उदय होण्यापूर्वी वतनदारी पद्धती अस्तित्वात होती. महाराजांनी या व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. आपल्या स्वराज्यात वतनदारी पद्धत बंद करुन त्यांनी वेतनावर अधिकारी नेमायला सुरुवात केली. महाराजांनी आपल्या स्वराज्यातील वतनदारी पद्धतीवर निर्बंध घातले आणि नवीन वतने देणे बंद केले. वतनदारी बंद करुन वेतनदारी पद्धत सुरु केल्याने राजकीय किंवा लषकरी गुणवत्तेनुसार पदे देण्यात आली. त्यामुळे सगळ्या जातीधर्मातील लोकांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला.

शिवरायांच्या होन नाण्याचे आजच्या हिशेबाने किती मूल्य होते ?

छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकावेळी होन हे स्वराज्याचे सुवर्ण चलन सुरु केले. त्यावेळच्या एका होनाचे वजन साधारणपणे २.७ ग्रॅम असायचे. आजच्या हिशेबाने बोलायचे झाले तर (१ ग्रॅम सोन्याचा आजचा दर ३२५० x २.७ = ८७७५) म्हणजेच शिवरायांच्या एका होन नाण्याचे आजचे मूल्य ८७७५ रुपये इतके आहे.

शिवरायांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील अधिकाऱ्यांना इतका पगार दिला !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारी जाऊन वेतनदारी व्यवस्था अमलात आली. महाराजांनी दिलेले वेतनमूल्य ही त्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांपैकी एक कारण आहे. महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना इतका वार्षिक पगार दिला की, त्या मंत्र्यांना वतनाची गरज पडणार नाही. पाहूया महाराजांनी आपल्या मंत्र्यांना वार्षिक किती पॅकेज दिले :

१) पेशवा – १५००० होन म्हणजेच १३ कोटी १६ लाख २५ हजार रुपये. २) अमात्य – १२००० होन म्हणजेच १० कोटी ५३ लाख रुपये. ३) सचिव – १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये.

४) वाकनीस – १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. ५) सेनापती – १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. ६) डबीर – १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये.

७) न्यायाधीश – १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. ८) पंडितराव – १०००० होन म्हणजेच ८ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये. इतका प्रचंड पगार महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळालाच नव्हे तर साध्या शिपायापासून सर्वांनाच दिला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *