बारावीत रिंकू राजगुरूच्या यशाची गाडी ‘सैराट’! मिळाले एवढे टक्के गुण..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ‘सैराट’ या चित्रपटामुळे नावारुपाला आलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील यंदा बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत रिंकू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत.

रिंकू राजगुरूला ६५० पैकी ५३३ गुण मिळाले आहेत. रिंकूने टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून १२ वीची परीक्षा दिली होती.

मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंलिशमध्ये सांगू काय असं म्हणणाऱ्या आर्चीला बारावी परीक्षेत इंग्रजी विषयात कमी म्हणजे ५४ मार्क मिळाले आहेत. रिंकू नियमित कॉलेजला जात नसल्याने तिने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून १२ वीची परीक्षा दिली होती. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती. यावेळी तिचे मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय होते.

दरम्यान, रिंकू परीक्षा देत असताना परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रिंकू राजगुरूला मराठीत ८६ , भूगोल विषयात तब्बल ९८ , इतिहास विषयात ८६ , राज्यशास्त्र विषयात ८३ , अर्थशास्त्र विषयात ७७ तर पर्यावरण स्टडी विषयात ४९ गुण मिळाले आहेत. तिला एकूण सात विषयात ६५० पैकी ५३३ गुण मिळाले आहेत. तिला सरासरी ८२ टक्के मार्क मिळाले आहेत.

यंदा बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५.५३ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *