वर्ल्डकपच्या दुसऱ्या सराव सामन्यात धोनीने तुफान फटकेबाजी करत झळकावले शतक!

विश्वकरंडक अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. भारतीय संघ आज बांगलादेश संघाविरुद्ध सराव सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजी सुरुवातीला थोडी गडगडली होती. पण त्यानंतर धोनी आणि केएल राहुलच्या बलाढ्य भागीदारीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभा केली.

भारताने ५० ओव्हरमध्ये ७ बाद ३५९ धावांपर्यंत मजल मारली.केएल राहुल आणि महेंद्रसिंग धोनीने भारताकडून शतकी खेळी खेळली. राहुल ९९ बॉलमध्ये १०८ धावांची खेळी करून बाद झाला. त्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले.

भारताचा शिखर धवनच्या रूपाने ५ धावांवर पहिला गडी बाद झाला. ५० धावसंख्या असताना रोहित आणि नंतर ८३ वर विराट कोहली बाद झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती. पण त्यानंतर केएल राहूल आणि महेंद्रसिंग धोनीने १६५ धावांची भागीदारी केली. दोघांनी सुरुवातीला हळू हळू जम बसवला आणि नंतर फटकेबाजी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन पोहचवले.

महेंद्रसिंग धोनीने टी २० सारखी खेळी खेळत ७८ बॉलमध्ये ११३ धावांची तुफानी पारी खेळली. यामध्ये त्याने ८ चौके आणि ७ छक्के फटकावले. धोनीची आजची फलंदाजी बघून भारतीय टीमने सुटकेचा निश्वास सोडला असेल. धोनीचा हाच फॉर्म विश्वचषकात राहावा हीच इच्छा कर्णधार कोहलीने व्यक्त केली असावी.

भारताला पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारताची फलंदाजी पहिल्या सामन्यात गडगडली होती. रवींद्र जडेजाने शेवटी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारत आली होती. अवघ्या ३९.२ षटकात भारताचा डाव १७९ धावांवर संपुष्टात आला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *