बॉलीवूडला सुपरस्टार देणाऱ्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूडमध्ये ८० पेक्षा जास्त सिनेमात ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम करणारे वीरु देवगण यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे ते वडील आहेत. अजय देवगणला घरातच ऍक्शन सीनचं बाळकडू देणाऱ्या वीरु देवगण यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली आणि देवगण कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

वीरू देवगण यांचे आज (२७ मे) सकाळी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. वीरु देवगण यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या ८० हून जास्त चित्रपटांत अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. अजय देवगण आज जो काही आहे, ते केवळ वडिल वीरू देवगण यांच्यामुळे.

अजय देवगणच्या जन्माआधीच आपल्या मुलाला अभिनेता बनवणार, हे वीरू देवगण यांनी ठरवले होते. याचे कारण म्हणजे, वीरू देवगण यांना स्वत:ला अभिनेता व्हायचे होते. हिरो बनण्यासाठी वीरू देवगण अमृतसरवरून पळून मुंबईला आले होते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

घरून पळून मुंबईत आलेल्या वीरू देवगण यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यास प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांनी अनेक कष्टांची कामं सुरुवातीला केली. त्यांनी सुरुवातीच्या काळात टॅक्सी स्वच्छ करण्यापासून तर कारपेन्टरचे कामं केले. त्यांचा चेहरा चॉकलेटी नसल्याने त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही.

पण त्यांनी आपले स्वप्न मात्र पूर्ण करण्याचे ठरवले होते. त्यांनी ठरवलं कि पहिला मुलगा होवा की मुलगी त्यांना अभिनेता वा अभिनेत्री बनवण्याचं ठरवलं. त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करत अजयला केवळ हिरो बनवले नाही तर सुपरस्टार बनवले. अजयला त्यांनी लहानपणीपासूनच ऍक्शनचे धडे दिले. डान्स क्लास, हॉर्स रायडिंग, जिम ट्रेनिंग चे क्लास त्याला दिले. पित्याची ही मेहनत फळली आणि १८ व्या वर्षी ‘फुल और कांटे’मधून अजयने डेब्यू केला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

वीरु यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच दिल क्या करे या चित्रपटाचे निमार्ते देखील तेच होते.

वीरू देवगण यांना खासरेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *