फोटोत दिसणारी ही स्टायलिश तरुणी बनली या मतदारसंघाची खासदार!

फोटो पाहून चमकलात ना ? एवढी सुंदर आणि ग्लॅमरस महिला एखादी मॉडेलच असणार असा विचार तुमच्या मनात आला असेल. तुम्ही अगदी बरोबर ओळखले आहे. ही सुंदर महिला एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर, सनी देओल, प्रकाश राज, जया प्रदा अशा कलाकारांप्रमाणेच या अभिनेत्रीनेही निवडणूक लढवली होती. ती निवडून आली असून आता खासदार म्हणून लोकसभेत जाणार आहे.

कोण आहेत या खासदार ?

मीमी चक्रबर्ती असे या खासदाराचे नाव असून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधील जादवपूर लोकसभा मतदारसंघातून ती विजयी झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अनुपम हाजरा यांचा तिने २९५२३९ मतांनी पराभव केला आहे. मीमी चक्रवर्ती ही बंगाली अभिनेत्री आहे.

त्याचबरोबर मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील कलाकार म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. तिने २० हुन अधिक बंगाली चित्रपट केले आहेत. सोशल मीडियावर आपले मादक फोटो शेअर करत असल्यामुळे ती बंगालमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

ममता बॅनर्जींनी का खेळले ग्लॅमर कार्ड ?

पश्चिम बंगालमध्ये मागच्या लोकसभेवेळी ममता बॅनर्जींना चांगले यश मिळाले असले, तरी तृणमूल काँग्रेससाठी यंदाची निवडणूक अवघड होती. त्यामुळे ममतांनी गतवेळीप्रमाणेच यंदाही ग्लॅमरचा फॉर्मुला वापरला. गतवेळी या फॉर्मूलाच्या आधारे त्यांनी आपली खासदार संख्या १९ वरून ३४ वर नेली होती. यंदा त्याच फॉर्मुल्याची पुनरावृत्ती करून त्यांनी भाजपचा उधळलेला वारू १८ जागांवर रोखत तृणमूल काँग्रेसला २२ जागा मिळवल्या आहेत.

संसदेत घुमणार अनेक सेलेब्रिटींचा आवाज-

यावेळेस सर्वच पक्षांनी दिग्गज सेलिब्रिटींना उमेदवारी दिली होती. बऱ्याच जणांनी विजय मिळवत संसदेत प्रवेश केला आहे. यामधे सर्वात मोठे नाव भाजपकडून निवडून आलेले नाव आहे अभिनेता सनी देओल. सनीने पंजाबमधील गुरुदासपूरमधून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे.

हेमा मालिनी मथुरामधून खासदार बनल्या आहेत. तर अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर दुसऱ्यांदा चंदिगढच्या खासदार बनल्या आहेत. भोजपुरी स्टार रवी किशन गोरखपूरचा खासदार बनला आहे.

याशिवाय सुपरस्टार मनोज तिवारी, स्मृती इराणी, नुसरत जहां, देव अधिकारी, शताब्दी रॉय आणि बाबुल सुप्रियो यांनी देखील संसदेत प्रवेश केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *