कोण आहेत हे प्रताप सारंगी ज्यांना ओडिशा चे मोदी म्हणून ओळखल्या जाते ?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने देशात पुन्हा मोदी लाट असल्याचे सिद्ध झाले आहे.या निवडणुकीमध्ये भाजपने ३०३ जागेवर घवघवीत यश प्राप्त केले असून एनडीए ह्या गठबंधनाने एकूण ३५० जागेंवर आपला शिक्कामोर्तब केला आहे. संपूर्ण सोशल मीडिया हा गुरुवार पासून निवडणुकीच्या निकालाने रंगून गेला असून सोशल मीडियावर नरेंद्र मोदींची सर्वाधिक चर्चा आहे. आणि मोदींच्या बरोबर आणखी एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे प्रताप चन्द्र सारंगी. प्रताप सारंगी यांनी ओडिशाच्या बालासोर मधून भाजपच्या सीटवर विजय मिळविला असून त्यांना सध्या ओडिशाचे मोदी म्हणून ओळखल्या जात आहे.

ट्विटर वर सुलगना दास यांनीएक पोस्ट शेयर केली असून त्यामध्ये सारंगीचे ३ फोटो आपणास बघायला मिळतात. या तिन्ही फोटोंत ते जमिनीवर बसून कागदपत्रे व आपल्या सामानांची आवरासावर करताना दिसत आहेत. या ट्विटरपोस्टचीबातमी लिहेपर्यंत ३६०० हुन अधिक रिट्विट केल्या गेले असून ७७०० पेक्षा अधिकलोकांनी लाईक केले आहे.

आपल्या ट्विट मध्ये सुलगाना लिहितात कि हे ओडिशाचे मोदी आहेत. यांनी विवाह केले नसून यांच्या मातोश्रीचे मागील वर्षी निधन झाले. यांच्याकडे गडगन्ज सम्पत्ती नसून हे एका छोट्याशा घरामध्ये राहतात. सायकलने प्रवास करतात.त्यांना त्याभागात लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे.

त्यातनंतर ट्विटरवर जणू यांच्याबद्दल पोस्टचा वर्षावच सुरु झाला आणि अनेक फोटो समोर आलेत. आणि नेटिझन्स कडून यांच्यावर सतत कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे. काही युजर्सनि तर प्रताप सारंगी हे ओडिशाचे मुख्यमंत्री व्हावे इथवर लिहिले आहे.

युजर्सइथे असे सांगतात कि सारंगी हे तळागाळात काम करणारे सच्चे समाजसेवक आहेत व ते लोकांशी जुळून असतात.धर्म आणि आस्था यांमध्ये त्यांना खूप आवड आहे.

सारंगी यांनी बिजू जनता दल चे रबिन्द्र कुमार जोना याना १२९५६ मतांनी धूळ चारली. बालासोर सीटवर १९५१,१९५७ आणि १९६२ मध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. १९६७ मध्ये हि सीट काँग्रेस कडून निसटून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI चा विजय झाला. त्यांनतर १९७१ मध्ये पुन्हा काँग्रेसने आपले वर्चस्व स्थापन केले.

१९७७ मध्ये पुन्हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI यांनी ती जागा जिंकली. १९८०,१९८४,१९९१,१९९६ च्या निवडणुकीत काँग्रेस ने सीट मिळविली व १९८९ मध्ये हीं जागा जनता दलाने जिंकली. १९९८ च्या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा बालासोर येथे विजय मिळविला त्यानंतर मागे वळून न पाहता १९९९,२००४ च्या निवडणुकीत भाजपा विजयी झाला. २००९ मध्ये काँग्रेसचे श्रीकांत कुमार जेना यांनी तर २०१४ मध्ये बीजेडी चे रबिन्द्र कुमार जेना यांनी विजय मिळविला.

लोकसभा निवडणुकी आधी सारंगी हे ओडिशाच्या विधानसभा मतदार संघातून २००४ आणि २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रताप सारंगी याना नरेंद्र मोदींच्या अगदी जवळचे मानले जाते. असे सांगितल्या जाते कि मोदी जेव्हा ओडिशा दौऱ्यावर असतात तेव्हा सारंगी यांची हमखास भेट घेतात.

गरीब कुटुंबात जन्मलेल्या सारंगी यांचा जन्म निलगिरी जिल्ह्यातील गोपीनाथपूर या गावात झाला. ४ जानेवारी १९५५ ला जन्मलेल्या सारंगी यांनी फकीर मोहन कॉलेज मधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.लहानपणापासून सारंगी हे अत्यन्त धार्मिक स्वरूपाचे होते. ते रामकृष्ण मठात साधू बनण्यास उत्सुक होते त्यासाठी त्यांनी वारंवार मठात जाऊन विनवणी केली पण जेव्हा मठातील लोकांना त्यांची आई विधवा आहे असे समजले तेव्हा त्यांना आईची सेवा करण्यास सांगितले.

त्यानंतर सारंगी गावी परतले आणि त्यांनी समाजकार्यात हातभार लावला.बालासोर आणि मयूरभंज ह्या आदिवासी भागात त्यांनी अनेक शाळा उघडल्या. २०१४ साली त्यांनी जेव्हा आपल्या सम्पत्तिचे विवरण पत्रक सादर केले तेव्हा त्यांच्याकडे केवळ १० लाख सम्पत्ती असल्याचे जाहीर केले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *