मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा मुस्लिम महिलेचा हट्ट, दुबईवरून फोन करून विनवण्या !

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याने त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. आज देशातील प्रत्येक लहानथोरांच्या मुखात एकच नाव आहे, नरेंद्र मोदी ! केवळ हिंदूच नाही तर मुस्लिमांमध्येही मोदी आपली छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत. नुकतेच एका मुस्लिम महिलेने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी दुबई वरुन फोन करुन तिला विनवण्या केल्याचा प्रसंग घडला आहे.

काय आहे हे प्रकरण ?

उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील ही घटना असून वजीरगंज मधील परसपूर मेहरौर गावातील मैनाज बेगम इदरिश या महिलेला काही दिवसांपूर्वी एक मुलगा झाला होता. २३ मे रोजी घरी मुलाच्या नामकरणाची चर्चा सुरु होती त्यादिवशीचा लोकसभा निवडणुकांच्या निकाल होते. ती महिला मोदींच्या कामकाजावर प्रभावित झाल्याने तिने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला लोकांना थट्टा वाटली, पण मैनाज बेगम हट्टाला पेटल्या.

दुबई वरुन फोन करुन विनवण्या

मैनाज बेगमचे पती मुश्ताक अहमद दुबईत नोकरीस आहेत. त्यांना हा प्रकार करताच त्यांनी दुबईवरुन पत्नीला फोन करुन विनवण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्नीच्या हट्टापुढे त्यांचेही काही चालले नाही आणि त्यांनी मुलाच्या नामकरणाचा परवानगी दिली.

मुलाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवण्यात आले. मुलायचे नाव कायदेशीर दस्तऐवजात नोंद व्हावे म्हणून मैनाज बेगम यांनी पंचायत समितीच्या सहाय्यक विकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित करुन त्या आशयाचे पत्र दिले.

मैनाज बेगमचे काय म्हणणे आहे ?

मैनाज बेगम यांनी आपल्या मुलाचे नाव कुटुंब नोंदवहीत दाखल करुन त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र देण्याची त्यांनी मागणी केली आहे. पुढच्या कार्यवाहीसाठी ते पत्र जन्म मृत्यु नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आले आहे. मैनाज बेगम यांचे म्हणणे आहे की मोदींनी तीन तलाकच्या विषयावर जो कायदा करुन मुस्लिम महिलांना मोठा आधार दिला आहे. मोदींनी आणलेल्या उज्वला योजना, इज्जत घर, जनधन योजनांमुळे गरिबांना आधार मिळाल्याचेही त्या सांगतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *