विदेशी म्हणून तुम्ही खरेदी करीत असलेल्या ह्या ३५ ब्रांड स्वदेशी आहेत..

अनेकदा आपली मानसिकता विदेशी ब्रांडच्या वस्तू कडे जास्त प्रमाणात झुकत राहते. परंतु काही प्रसिद्ध भारतीय ब्रांड ज्या जगात राज्य करतात त्या भारतीय आहे. याच विचारा मुळे अनेक ब्रांडने आपले नाव बदलली आहेत. मजेची गोष्ट हि आहे कि ज्या कंपनीने नाव बदलली आहे त्यांचा प्रगतीचा आलेख वाढलेला आहे. आज आपण असेच ब्रांड पाहणार आहोत ज्यांचे नाव विदेशी आहेत परंतु त्या आहेत स्वदेशी.

१. Louis Philippe मेन्स फैशन मध्ये प्रसिद्ध असलेली हि कंपनी आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी Madura Fashion & Lifestyle ने 1989 मध्ये सुरु केली आहे. २. Peter England हि सुध्दा मेन्स फैशन मध्ये एक प्रसिद्ध कंपनी आहे आयरलैंड मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मालक आदित्य बिर्ला ग्रुप आहे. 1997 मध्ये Madura Fashion & Lifestyle ने हि कंपनी सुरु केली.

३. जग्वार कार १९३६ मध्ये इंग्लंड येथे सुरु झालेली हि कंपनी आहे. परंतु सध्या हिचे मालकी हक्क टाटा ग्रुप कडे आहेत. ४. Da Milano हि कंपनी लेदर पासून बनविलेल्या वस्तू विकते आणि याची सुरवात १९३६ मध्ये मलिक परिवाराने सुरु केलेली आहे. ५. Allen Solly या ब्रांडचा देखील मालकी हक्क आदित्य बिर्ला ग्रुप कडे आहे.

६. Monte Carlo या ब्रांडचे मालक Oswal Woollen Mills Limited हि कंपनी आहे परंतु याची पैरेंट कपनी नायर ग्रुप आहे. ७. American Swan हि एक दैनदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू बनविणारी कंपनी आहे परंतु याचे मालक भारतीय कंपनी आहे. ८. HiDesign हि कंपनी लेदरच्या वस्तू करिता प्रसिद्ध आहे. या कंपनीचे मालक दिलीप कपूर आहे. याची स्थापना १९७८ मध्ये झाली होती.

९. Lakme जे.आर.डी. टाटा यांनी हि कंपनी १९५२ मध्ये स्थापन केली आहे. हि कंपनी महिला करिता सौंदर्य प्रसाधने बनविते. १०. East India Company हि १६ व्या दशकात स्थापन केलेली कंपनी आहे परंतु सध्या हिचे मालक संजीव मेहता आहे जे एक भारतीय आहे. ११. Amrut Single Malt मद्य बनविणारी हि कंपनी आहे आणि त्याची पैरेंट कंपनी Amrut Distilleries नावाची भारतीय कंपनी आहे.

१२. Franco Leone विशाल भांबरी यांनी हा फैशन ब्रांड १९८९ मध्ये सुरु केली होती. १३. Van Huesen युएस आणि भारतात प्रसिद्ध असलेली हि कंपनी Phillips Family ने १८ व्या शतकात केली होती सध्या हिचे मालक आदित्य बिर्ला ग्रुप आहे. १४. Munich Polo लहान मुलांचे कपडे बनविणारी या कंपनीचे मालकी हक्क भारतीय कंपनी Munich Polo यांच्या कडे आहे.

१५. Flying Machine यांची पेरेंट कंपनी Arvind Limited ज्याचे मालक संजय लालभाई आहे. १६. And Designs ची सुरवात १९९५ मध्ये House of Anita Dongre Limited या कंपनीने केलेली आहे. १७. La Opala हि कंपनी tableware करिता प्रसिद्ध आहे आणि याची मालकी भारतीय कंपनी La Opala RG Limited कडे आहे. १८. Larsen and Toubro Limited यांची परेंट कंपनी Henning Holck-Larsen and Soren Kristian Toubro आहे व याची स्थापना १९३७ मध्ये भारतात करण्यात आली.

१९. Cafe Coffee Day १९९६ मध्ये Coffee Day Enterprises Limited या कंपनीने भारतात हि ब्रांड सुरु केली. २०. Old Monk रमची हि जग प्रसिद्ध ब्रांड १९५४ मध्ये Mohan Meakin यांनी सुरवात केली. २१. Micromax हि कंपनी २००० मध्ये राहुल शर्मा, विकास जैन, सुमित अरोड़ा आणि राजेश अग्रवाल यांनी सुरु केली आहे. २२. Britannia बेकरी प्रोड्क्ट बनविणारी हि कंपनी वाडिया ग्रुपने 1892 मध्ये सुरु केली.

२३. MRF टायर बनविणारी प्रसिद्ध कंपनीची सुरवात K. M. Mammen Mappillai यांनी १९४६ मध्ये सुरवात केली. २४. Ferns N Petals १९९४ मध्ये सुरवात झालेल्या या कंपनीचे मालक विकास गुटगुटिया हे आहे. २५. Raymond या ब्रांडची सुरवात Raymond Group ने केली जी एक भारतीय कंपनी आहे. २६. Westside या कंपनीचे मालक टाटा ग्रुप आहे. २७. Spykar आपल्या प्रसिद्ध डेनिम करिता आहे आणि याचे मालक प्रसाद पबरेकर हे आहे.

२८. Park Avenue हा ब्रांड रेमंड ग्रुप कडे आहे. २९. Knotty Derby and Arden Shoes बूट बनविणारी या कंपनीचे मालक Sumanglam Impex Private Limited हि भारतीय कंपनि आहे. ३०. The Collective या कंपनीला २००८ मध्ये आदित्य बिर्ला नुवोने सुरु केले आहे. ३१. Planet Fashion या फैशन रिटेल चैनचा मालक आदित्य बिर्ला ग्रुप आहे. ३२. Redwolf २०११ मध्ये सुरु झालेल्या कंपनीचे मालकी हक्क भारतीय कंपनी Independent Label कडे आहे.

३३. Everready हि बैटरी बनविणारी कंपनी आहे आणि याची मालकी बी.एम. खैतान ग्रुप कडे आहे. ३४. Anchor हि कंपनी विजेचे उपकरण वायर करिता प्रसिद्ध आहे आणि याची सुरवात Panasonic Corporation १९६३ मध्ये केली. ३५. Kenstar कुलर आणि एसी करिता प्रसिद्ध असलेली हि कंपनी Kitchen Appliances India Limited याचा हक्क टाटा ग्रुप कडे आहे.

हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *