अनोख्या लग्नात नवरदेवाने नवरीशिवाय एकट्यानेच घेतले सात फेरे, वरातीतही आनंदाने नाचला!

त्या लग्नात ते सर्वकाही होते, जे सर्वसाधारणपणे एखाद्या लग्नात असते. बँडबाजाच्या संगीतावर आनंदाने नाचणारे वरती मंडळी, रंगीबेरंगी सजावट, घोड्यावर बसुन वरातीसोबत आनंदात चाललेला नवरदेव ! पण हैराणीची गोष्ट ही आहे की, लग्नाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या नवरी मुलीशिवायच हे सगळं सुरु होते. ते सुद्धा अत्यंत आनंदाच्या वातावरणात ! आहे ना आश्चर्याची गोष्ट ? पाहूया नेमकी काय आहे या अनोख्या लग्नाची भानगड…

कुठे पार पडला हा अनोखा लग्नसोहळा ?

असे कुठेच झाले नसेल की नवरी मिळत नाही म्हणून लग्नसोहळ्यासारखे आयोजन करुन त्यात लग्नासारखी सगळी व्यवस्था केली आणि एकट्यानेच लग्नाच्या सगळ्या विधी पार पाडुन नवरदेव बनण्याचे सुख प्राप्त केले ! पण हा बुचकळ्यात पाडणारा लग्नसोहळा गुजरातमध्ये पार पडला आहे.

वास्तविक पाहता गुजरातच्या हिंमतनगर येथे राहणारा २७ वर्षांचा अजय बरोत हा मानसिकदृष्ट्या ठीक नाही. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अजयची लग्न करण्याची इच्छा होती, पण त्याच्या अनुरूप नवरीमुलगी मिळत नव्हती.

मुलाच्या आनंदासाठी आईवडिलांनी घेतला हा निर्णय !

अनेक दिवस शोध घेऊनही नवरीमुलगी मिळत नाही म्हणुन शेवटी कुटुंबीयांनी बराच विचार करुन नवरीमुलगी शिवायच अजयचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयनेही यासाठी होकार दिला. त्यानंतर लग्नासारखे लग्न व्हावे या दृष्टीने नियोजनाला सुरुवात झाली. लग्नपत्रिका छापुन वाटण्यात आल्या.

वरात काढण्यात आली. शेरवानी घातलेला अजय घोड्यावर बसला. त्याची वरात काढण्यात आली. त्यांनतर लग्नमंडपात अजयने नवरीशिवाय सात फेरे घेतले. सगळ्या विधी करण्यात आल्या. लग्नाला ८०० लोक आले होते. मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अजयच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *