सावधान! फ्रेंच किसचे आहेत गंभीर परिणाम.. जोडीदाराला होऊ शकतो हा गंभीर आजार

असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे अनेक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज होण्याचा धोका असतो. त्यामध्ये std किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन sti सारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय अनेक गंभीर परिणाम असुरक्षित संबंधामुळे होऊ शकतात. तसेच याच कारणामुळे ‘गॉनोरिया’ या नावाचा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो.

जगभरात ‘गॉनोरिया’ हा रोग सामान्य आहे जो बहुतेकांना होतो. वास्तविक पाहात हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो. पण अलिकडेच या आजाराबाबत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आजपर्यंत आपण अनेकदा वाचलं असेल कि किस करण्याचे फायदे आहेत. बरेच फायदे तुम्हाला माहिती देखील असतील. पण एका रिसर्चमध्ये समोर आले आहे कि ‘गॉनोरिया’ हा आजार जोडीदाराला किस केल्याने पसरत आहे. जोडीदाराला किस करताना या आजाराचे विषाणू तुमच्या शरीरारत प्रवेश करतात. ज्याचा दुष्परिणाम सर्वात पहिले तुमच्या घशावर पडतो.

यासंदर्भात ‘सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन’ या मासिकात एक वृत्त प्रकाशित झाले आहे. फ्रेंच किस करताना आणि दीर्घकाळापर्यंत चुंबन घेताना हा आजार पसरतो. बायसेक्शुअल म्हणजेच समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांनासुद्धा तो होऊ शकतो. या आजाराचा प्रभाव रेक्टम, गळा आणि डोळ्यांवर पडतो. कोणतंच औषध अंगी लागत नसल्याने ‘गॉनोरिया’ हा आजार असाद्य मानला जातो.

दिर्घकाळापर्यंत फ्रेंच किस केल्याने हा आजार पसरत असल्याने, याबाबत केवळ सल्ला देऊन चालणार नसल्याचे शोधकर्त्यांनी म्हंटल आहे. ‘गॉनोरिया’ हा आजार हेट्रोसेक्शुअल्सच्या तुलनेत बायसेक्शुअल लोकांमध्ये जास्त प्रमाणात पसरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हेट्रोसेक्शुअल्स ही सगळ्यात सामान्य अवस्था आहे. ह्यामध्ये एखदी व्यक्ती तिच्या अपोझिट जेन्डरच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. आणि जर कोणाला स्त्री आणि पुरुष ह्या दोघांविषयी आकर्षण वाटत असेल तर ह्याला बायसेक्शुअल असे म्हणतात.

२०१६-१७ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलर्बन इथे सार्वजनिक आरोग्य सेवा देणाऱ्या संघटनांनी ३१०० समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांच्या रक्ताची तपासणी केली होती. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *