जाणून घ्या नंबर प्लेटच्या रंगावरून गाडीत कोण आहे ?

प्रवास करताना आपणास नेहमी वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट नेहमी दिसत असेल परंतु कधी विचार केला का या नंबर प्लेटचा काय अर्थ होतो ? कधी पिवळी, काळी , निळी, लाल इत्यादी नंबर प्लेट आपणास दिसतात परंतु त्यामागील अर्थ आपणास माहिती नसतो. आज खासरेवर त्याविषयीच आपण माहिती बघणार आहो. गाडीचा नंबरप्लेटचा रंग आपणास वेगवेगळी माहिती देतो.

पांढरी नंबर प्लेट

पांढरी नंबरप्लेट आणि त्यावर काळी अक्षरे असणारी गाडी हि वैयक्तिक वापर करण्याकरिता आहे. वैयक्तिक मालकीच्या गाड्यांना पांढरी नंबर प्लेट लावण्यात येते. ती गाडी भाड्याने देण्यास किंवा व्यवसायाकरिता वापर करिता येत नाही. पांढऱ्या नंबर प्लेट वाली गाडी दिसल्यास आपण आता आरामात ती वैयक्तित वापराकरिता आहे हे ध्यानात येणार.

पिवळी नंबर प्लेट

पिवळी नंबर प्लेट आणि त्यावर असणारे काळे अक्षरे असणारी गाडी हि व्यावसायिक वापरा करिता आहे. टैक्सी, बस , ट्रक इत्यादी वर आपणास हि दिसणार. या गाडीला चालविण्याकरिता व्यावसायिक परमिटची आवश्यकता असते.

काळी नंबर प्लेट

काळी नंबर प्लेट आणि त्यावर पिवळी अक्षरे या नंबर प्लेटचा अर्थ असा होतो कि हि गाडी भाड्याची आहे परंतु भाड्याने घेणारा स्वतः चालवत आहे. या गाड्या चालविण्याकरिता आपणास स्पेशल परमीटची गरज नाही आहे.

निळ्या रंगाची नंबर प्लेट

हलक्या निळ्या रंगाची नंबर प्लेट आणि त्यावर पांढरी अक्षरे हि परदेशातील आलेल्या दूतावासा करिता असेत. या नंबर प्लेट देशाचा कोड आणि त्या पुढे UN (United Nations), CD (Diplomatic Corps) किंवा CC (Consular Corps) या अक्षराने लिहिल्या जातात.

लाल नंबर प्लेट

लाल नंबर प्लेट आणि त्यावर पांढरी अक्षरे हि नवीन किंवा टेस्ट करिता वापरण्यात येणाऱ्या गाड्या करिता वापरण्यात येते. रोडवर गाडी कशी चालते इत्यादी टेस्ट घेण्याकरिता या गाड्या वापरण्यात येतात.

लाल नंबर प्लेट सोनेरी अक्षर

जर आपणास लाल नंबर प्लेट आणि त्यावर सोनेरी अक्षरे दिसली तर ती गाडी भारताचे राष्ट्रपती किंवा राज्यपाल वापरतात. त्यांच्या गाड्याच्या नंबर प्लेट या सोनेरी अक्षरात आणि लाल पट्टीवर हे नंबर लिहण्यात येतात.

वर बाण आणि नंबर असणारी प्लेट

भारतीय सैन्याच्या गाड्या सरंक्षण मंत्रालया द्वारा पासिंग करण्यात येते त्यामुळे या गाड्याची नंबर लिहायची पद्धत देखील वेगळी आहे. सुरवातील एक बाण जो वर असतो त्याला Broad Arrow असे म्हणतात आणि त्यानंतर येणारे दोन आकडे हे गाडी कधी बनली हे सांगतात. ब्रिटीशांचे राज्य असणार्या अनेक देशात हि पद्धत वापरली जाते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *