२३ वर्षांची पत्रकारिता सोडून राजकारणात आलेले इम्तियाज जलील बनले खासदार

मागच्या २५ वर्षांपासून मुस्लिम नेतृत्वापासून वंचित असणाऱ्या औरंगाबादला वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांच्या रूपाने नवा खासदार मिळाला आहे. त्यापूर्वी ते आमदार म्हणूनही निवडून आले होते. मागच्या पाच वर्षात कधी अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केल्याने तर कधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करून परत माघारी घेतल्याने इम्तियाज जलील वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र चुरशीच्या लढतीत शिवसेना आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षावर मात करत त्यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला.

पत्रकार ते आमदार ते खासदार

इम्तियाज जलील यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक पत्रकार म्हणून केली. त्यांनी ११ वर्ष लोकमत आणि १२ वर्ष NDTV मध्ये पत्रकार म्हणून काम केले. पुण्याचे NDTV ब्युरो चीफ म्हणून काम करत असताना ते एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांना भेटले. त्यानंतर आपली २३ वर्षांची पत्रकारिता सोडून त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

लागलीच २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशामुळे वंचित बहुजन आघाडीने त्यांना लोकसभेची संधी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करून जलील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.

जलील यांनी एमआयएम पक्ष का निवडला ?

इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष निवडण्यामागे तीन कारणे होती. पहिले एमआयएमच्या हैद्राबाद, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागातील कामाने ते प्रभावित झाले होते. दुसरे कारण इतर धर्मनिरपेक्ष पक्ष त्यांना संधी द्यायला तयार नव्हता.

तिसरे कारण कुठलाही पक्ष औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी देण्यास इच्छुक नव्हता. त्यामुळे त्यांनी एमआयएम पक्ष निवडला. त्यावेळी त्यांच्या निर्णयाने अनेकजण अषाचार्यचकित झाले, कारण इम्तियाज जलील हे एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून ओळखले जायचे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *