मोदींच्या विजयानंतर काँग्रेसने या तीन प्लॅनचे लेटर ड्राफ्टचे काय केले असेल ?

निकालानंतर भाजप नेते सरकार बनवण्याच्या कामाला लागले आहेत. दुसऱ्या बाजूला निकाल लागेपर्यंत एक्झीट पोलवर विश्वास नसणाऱ्या काँग्रेसच्या सगळ्या आशाही मावळल्या. त्यांना विश्वास होता की भाजपला बहुमत मिळणार नाही आणि आपल्याला सरकार बनवण्याची संधी मिळेल.

म्हणूनच त्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधून तीन टप्प्यांचा प्लॅन तयार केला होता. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवींच्या नेतृत्वाखालील टीमने तीन लेटर ड्राफ्ट तयार केले होते.

काय होता प्लॅन ?

जर NDA ला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्ष UPA+ या नवीन नावाने आघाडीची घोषणा करणार होते. आपल्या घटक पक्षांच्या सहीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पहिले पत्र पाठवून त्यांना नवीन आघाडीविषयी माहिती देण्यात येणार होती. दुसऱ्या पत्रात द्वारे सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार होता. तिसऱ्या पत्रात रात्री उशिरा नवीन UPA+ आघाडीच्या नेत्याच्या म्हणजेच प्रधानमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्यात येणार होती.

प्रधानमंत्रीपद सोडायला तयार होती काँग्रेस

काँग्रेसचा अंदाज होता की भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, परंतु त्यांना बहुमत मिळणार नाही. काँग्रेसला १२० ते १४० जागा मिळण्याचा अंदाज होता. त्याबरोबरच उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडु, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात मधील प्रादेशिक पक्ष त्याबरोबरच काँग्रेसची सरकार असणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही प्रधानमंत्री बनवायला तयार होती. ज्या नावावर सर्वांची सहमती असेल त्यांना काँग्रेस पाठिंबा देणार होती. कर्नाटकच्या एच.डी.देवेगौडा यांचे उदाहरण डोळ्यासमोर होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *