निकाल येण्यापूर्वी हत्या झालेला उमेदवार निवडणुकीत विजयी झाला !

अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यात २१ मे या दिवशी नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासोबतच ११ जणांची नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या (NSCN) उग्रवाद्यांनी हत्या केली होती. तिरोंग अबोह जेव्हा आपल्या आसाम विधानसभा मतदारसंघ पश्चिम खोंसा येथे परतत होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला होता. ते तिथूनच निवडणूक लढवत होते. निवडणूक लढवू नये म्हणून त्यांना अनेक नागा उग्रवादी संघटनांनी धमकी दिली होती.

निवडणुकीत विजयी झाले तिरोंग अबोह

अरुणाचलमध्ये लोकसभेच्या २ जागांसह विधानसभेच्या ६० जागांसाठी नुकतेच मतदान झाले होते. २३ मे रोजी लोकसभेसोबतच आसाम विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले. त्यात तिरोंग अबोह यांनी पश्चिम खोंसा मतदारसंघातून भाजपच्या फवांग लोवंग यांना १०५५ मतांनी पराभूत केले.

पण आपला विजय पाहण्यासाठी अबोह या जगात नाहीत. त्यामुळे खोंसा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली जाईल. अबोह २०१४ मध्येही पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या तिकिटावर निवडून आले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंहांचे ट्विट

तिरोंग अबोह यांच्या हत्येनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले, ज्यात ते म्हणतात “आमदार तिरोंग अबोह जी, त्यांचा परिवार आणि अरुणाचल प्रदेश मधील इतरांच्या हत्येने मला धक्का आणि दुःख झाले.

उत्तर-पूर्व भागातील शांत आणि सामान्य जीवनात व्यत्यय आणण्याचा हा एक अवमानजनक प्रयत्न आहे. या घटनेच्या पाठीशी असणाऱ्या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. शोकग्रस्त कुटुंबांना माझे सांत्वन !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *