मोदी, शहा, राहुल गांधी नाही; तर हे ‘पाटील’ आले देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून..

‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.

वाराणसीतून मोदी यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत विजय संपादन केला आहे. मोदींनी तब्बल ३ लाख ८४ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये मोदी ३ लाख ८२ हजार मतांच्या फरकांने विजयी झाले होते.

महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने उत्तर मुंबईमधून भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल ४ लाख ६५ हजार मतांनी पराभव केला आहे.

पण देशाचा विचार केला तर सर्वात जास्त मताधिक्य नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा राहुल गांधी यांच्यापैकी कोणाला मिळाले असेल, असं आपल्याला वाटू शकतं. पण या तिघांना किंवा भाजप, काँग्रेसच्या एखाद्या मोठ्या नेत्याला देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवता आला नाहीये. तर हा विजय भाजपच्या एका खासदाराने मिळवला आहे.

कोण झालं देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयी-

या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यावर देशातून सर्वाधिक मताधिक्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मिळाले नाही तर ते भाजपच्याच सी. आर. पाटील यांना मिळाले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम भाजपचे खासदार सी. आर. पाटील यांनी केला आहे. गुजरातच्या नवसारी मतदारसंघात त्यांनी तब्बल ६.८९ लाख मतांनी काँग्रेसचे धर्मेशभाई पटेल यांचा पाटील यांनी पराभव केला.

सी. आर पाटील यांना ९६९४३० एवढी मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी धर्मेशभाई पटेल यांना २८१६६३ एवढी मते पडली आहेत. तर या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या विणा सिंह यांना ९३३१ एवढी तिसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. या मतदारसंघात नोटालाही तब्बल ८८७८ एवढी मते पडली आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *