याच त्या घोषणा ज्यांनी गेल्या ७० वर्षांत देशातील निवडणुका गाजवल्या ! नक्की वाचा

लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. निकालानंतर विजेते आनंद साजरा करतात, पराभूत आत्मपरीक्षण करतात आणि जनता आपल्या दैनंदिन रहाटगाड्यात व्यस्त होऊन जाते. या सगळ्यात आलेली आणि गेलेली कुठलीही निवडणूक लक्षात राहते ती त्या निवडणुकीतील वेगवेगळ्या घोषणांनी !

आपल्या देशाच्या राजकीय इतिहासातील अनेक नेते तर त्यांनी दिलेल्या घोषणांवरुनच लोकप्रिय झाले आहेत. आज आम्ही आपल्याला देशाच्या निवडणूक इतिहासातील अशा लोकप्रिय घोषणा सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने विविध पक्षांनी, नेत्यांनी सत्तेच्या शिड्या चढण्याचा प्रयत्न केला. पाहूया काही लोकप्रिय घोषणा…

१) खरो रुपयो चांदी को, राज महात्मा गांधी को – (१९५२ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसची घोषणा), जिंदा कौमें पांच सालतक इंतजार नहीं करतीं – (समाजवादी नेता राम मनोहर लोहिया यांची लोकप्रिय घोषणा), लाल किले पर लाल निशान, मांग रहा है हिंदुस्थान – (डाव्या पक्षांनी या घोषणा दिल्या होत्या), रोटी, कपडा और मकान, मांग रहा है हिंदुस्तान – (समाजवादी नेत्यांची लोकप्रिय घोषणा)

२) जली झोपडी भागे बैल, यह देखो दिपक का खेल (जनसंघ), इस दीपक में तेल नही, सरकार बनाना खेल नही (काँग्रेस) (साठच्या दशकात जनसंघ आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात दिलेल्या घोषणा)

३)जमीन गई चकबंदी में, मकान गया हदबंदी में, द्वार खडी औरत चिल्लाये, मेरा मरद गया नसबंदी में, नसबंदी के तीन दलाल- इंदिरा, संजय, बंसीलाल, आकाश से नेहरू करें पुकार, मत कर बेटी अत्याचार(नसबंदी विरोधात जनतेच्या घोषणा)

४) संजय की मम्मी, बडी निकम्मी, बेटा कार बनाता है, मां बेकार बनाती है, इंदिरा हटाओ देश बचाओ- (१९७७ मध्ये कामगार नेते जयप्रकाश नारायण यांनी दिलेली घोषणा), देखो इंदिराका ये खेल, खा गयी राशन पी गयी तेल – (इंदिरा गांधींच्या गरिबी हटाव घोषणेला उत्तर), जगजीवन रामकी आयी आंधी, उड जायेगी इंदिरा गांधी – (१९७७ मधील इंदिरा गांधींच्या विऱोथातील घोषणा) राजा नहीं फकीर है, देश की तकदीर है – (१९८९ मध्ये व्ही.पी.सिंह यांच्यासाठी देण्यात आलेल्या घोषणा)

५)गरीबी हटाओ – (१९७१ मधील इंदिरा गांधींची सर्वात लोकप्रिय घोषणा), इंडिया इज इंदिरा अँड इंडिया इज इंदिरा – (काँग्रेस नेता देवकांत बरुआ यांची आणिबाणीदरम्यानची घोषणा, आधी रोटी खायेंगे, इंदिराजी को लायेंगे – (१९८० मध्ये जनता पार्टीविरोधात काँग्रेसने दिलेली घोषणा), एक शेरनी सौ लंगुर, चिकमंगळूर चिकमंगळूर – (१९७८ चिकमंगळूर पोटनिवडणूकीत इंदिरा गांधींसाठी घोषणा)

६) जब तक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा – (१९८४ इंदिरा गांधी हत्येनंतर काँग्रेसने दिलेली घोषणा), उठे करोडो हाथ हैं, राजीवजी के साथ हैं – (इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची घोषणा), राजीव तेरा ये बलिदान, याद करेगा हिंदुस्थान – (१९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसने दिलेली घोषणा)

७) मंदिर वहीं बनायेंगे – (राममंदिर आंदोलनात भाजपने दिलेल्या घोषणा), अटल बिहारी बोल रहा है, इंदिरा शासन डोल रहा है – (जनसंघाच्या काळातील लोकप्रिय घोषणा), सबको देखा बारीबारी, अबकी बारी अटल बिहारी – (१९९६ च्या निवडणुकीत भाजपने दिलेली घोषणा), ये राम और रोम की लडाई है – (१९९९ च्या निवडणुकीत भाजपने सोनिया गांधींविरोधात दिलेली घोषणा), फील गुड – (२००४ मधील अटलबिहारी वाजपेयींची लोकप्रिय घोषणा)

८) तिलक तराजु और तलवार, इनको मारो जुते चार – चलेगा हाथी उडेगी धूल, ना रहेगा हाथ, ना रहेगा फूल – (कांशीराम यांची सवर्णांविरोधातील घोषणा) हाथी नहीं गणेश है, ब्रह्मा-विष्णु-महेश है – (बहुजन समाज पार्टीची २००७ मधील लोकप्रिय घोषणा), भुरा बाल साफ करो – (१९९२ मध्ये लालूप्रसाद यादवांनी सवर्णांना चिथवण्यासाठी दिलेली घोषणा),मां माटी मानुष – (२०१० मधील ममता बॅनर्जींची लोकप्रिय घोषणा)

९) अच्छे दिन आनेवाले है, अबकी बार मोदी सरकार – (२०१४ मधील भाजपच्या घोषणा), कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा _ (२०१४ मधील महाराष्ट्रातील भाजपची घोषणा)

१०) चौकीदार चोर है – (२०१९ मध्ये काँग्रेसने मोदींविरोधात दिलेली लोकप्रिय घोषणा), हां मैं भी चौकीदार हूँ , फिर एक बार मोदी सरकार – (२०१९ मधील भाजपच्या घोषणा)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *