देव जरी आला तरी कॉम्प्रमाईज नाही : उदयनराजेंचा इशारा बघा व्हिडीओ

देशात कुठल्याही पक्षाचे वारे वाहत असले तरी साताऱ्यात मात्र एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे उदयनराजे ! याचा प्रत्यय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने सर्वांनी पुन्हा एकदा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यात पुन्हा एकदा उदयनराजेंचीच कॉलर टाईट राहणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आपल्या विजयाची खात्री होताच उदयनराजेंनी पत्रकारांसमोर येऊन आपल्या नेहमीच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.

यंदा उदयनराजेंचे मताधिक्य घटले

यंदा साताऱ्यात उदयनराजेंसमोर शिवसेनेने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांच्या रूपात तगडे आव्हान निर्माण केले होते. प्रचारादरम्यान उदयनराजेंनी कॉलर आणि नरेंद्र पाटलांच्या मिशांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. शेवटी उदयनराजेंची कॉलरच नरेंद्र पाटलांच्या मिशीवर भारी पडली. मात्र गेल्यावेळच्या तुलनेत उदयनराजेंचे मताधिक्य घातल्याचे दिसून येत आहे. गतवेळी त्यांना ३६६५९४ चे मताधिक्य होते, ते घटून यंदा १११४०० पर्यंत खाली आले आहे.

आजच्या निकालावर काय म्हणाले उदयनराजे ?

आजच्या निकालावरून देशात परत एकदा भाजप सरकार सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या निकालाविषयी उदयनराजेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितले की, “सगळ्यांचे सगळे निकाल लागू द्या. मग मी उद्या बोलतो. त्यानंतर सगळ्यांना मी सुट्टी देणार नाही. जिथे लोकांच्या हिताचा प्रश्न असेल तिथं अजिबात कॉम्प्रमाईज नाही. कोणीही असू द्या मग, देव जरी आला तरी कॉम्प्रमाईज नाही.”

खाली बघा व्हिडीओ

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *