काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीतील किल्ला ढासळण्याच्या मार्गावर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यावर्षी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उत्तरप्रदेशातील पारंपरिक अमेठी मतदारसंघ आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून ! राहुल गांधींनी निवडणुकांदरम्यान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला जोरदार टक्कर दिली होती. राहुल गांधींचा उधळलेला वारू रोखण्यासाठी मोदींनी अमेठीमध्ये स्मृती इराणींना अजून एकदा उमेदवारी देऊन राहुल गांधींना तगडे आव्हान दिले होते, तर राहुल गांधींनी जोखीम नको म्हणून केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती.

अमेठी आणि काँग्रेस

१९९८ चा अपवाद वगळता अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गांधी घराण्यातील संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राजीव गांधी इथून खासदार राहिले आहेत. १९९८ मध्ये भाजपचे संजयसिंह हे एकमेव काँग्रेसेतर पक्षाचे खासदार इथून निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधींनी स्मृती इराणींचा जवळपास १ लाख मतांनी पराभव केला होता.

सकाळपासून राहुल गांधी पिछाडीवर

मागच्या निवडणुकीत राहुल गांधींनी मोदी लाटेत विजय मिळवला असला तरी यंदा कसलीही लाट नसतानाही वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. यंदा काँग्रेसचा अमेठीतील किल्ला ढासळण्याच्या मार्गावर आहे. अमेठीतून सकाळपासून राहुल गांधी पिछाडीवर आहेत. २:१५ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सध्या राहुल गांधी मतांनी ९७६६ मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणी शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *