रातोरात पक्ष बदलून महाराष्ट्रात हे चेहरे होणार खासदार…

या लोकसभा निवडणुकीत देशात काही चमत्कार घडले आहेत. काही लोकांनी पक्ष बदलून एका रात्रीत दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन खासदार होण्याचा मान मिळवला आहे. निष्ठावान असावे अशी एक लोकांची भावना असायची पण या निवडून आलेल्या लोकांची लिस्ट पाहिली तर निष्ठा कोणावर ठेवावी हा प्रश्न पडेल..

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चित उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील हे राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस मधून येऊन भाजप चे तिकीट घेऊन आता विजयी होण्याचा मान मिळवला. सुजय विखे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी ठाण मांडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांनी अचानक पणे भाजपातील विद्यमान खासदारांचे तिकीट कट करून भाजपात प्रवेश केला आणि खासदार होण्याचा मान मिळवला.

शिवसेनेचे आमदार असणारे बाळू धानोरकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेस मध्ये प्रवेश मिळवला होता. पण शेवटी त्यांचे तिकीट काँग्रेस ने कापले होते पण जनसामान्यांच्या रोषाला काँग्रेसला सामोरे जावे लागत होते म्हणून दबावाखाली येऊन त्याना काँग्रेस ने तिकीट दिल. आणि महाराष्ट्रातील काँग्रेस चे खाते बाळू धानोरकर यांनी उघडले आहे.

पालघर मतदारसंघात राजेंद्र गावित हे तसे काँग्रेसचे पण त्यांनी भाजपात प्रवेश केला होता पण या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेने मध्ये प्रवेश करून खासदार झालेत.

डॉ अमोल कोल्हे हे प्रसिद्ध अभिनेते त्यांनी शिवसेने मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला व खासदारकी ची निवडणूक शिवसेनेचे नेते आढळराव पाटील विरोधात लढवली व त्यात अमोल कोल्हे यांना यश मिळाले.

धर्यशील माने हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत आले त्यांच्या आई या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून प्रसिद्ध शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा पराभव करून खासदार होण्याचा मान मिळवला.

प्रताप पाटील चिखलीकर हे पक्ष बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते सुरुवातीला विलासराव देशमुख यांचे निष्ठावंत म्हणून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिवसेना आणि या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप तर्फे निवडणूक लढवून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पराभूत करून निवडून येण्याचा मान मिळवला आहे.

माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला त्या बालेकिल्ल्यात त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे विद्यमान तिकीट कट करण्याची भूमिका घेतली. त्यातून विजयसिंह मोहिते त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्या माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे पण त्यांनी भाजपात येऊन विजयी होण्याचा मान मिळवला.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *