मोदींच्या फॅनने मतमोजणीच्या दिवशी अमेरिकेत कमालच केली ! वाचा काय केले

एका बाजूला आपल्या देशातील लोक लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहण्यासाठी सकाळपासून घरातल्या टीव्हीसमोर बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाहेरच्या देशात राहणाऱ्या भारतीयांही या निकालाची उत्सुकता आहे. अमेरिकेतही भारतीय लोक निवडणूक निकालांकडे डोळा लावून बसलेले आहेत. त्या लोकांना निवडणुकांचे ताजे निकाल पाहता यावेत, यासाठी एका मोदी समर्थकाने मिनेसोटा येथील मिनेपोलिस याठिकाणचे अख्खे थिएटरच बुक केले आहे. जाणून घेऊया याबाबद्दल…

कोण आहे हा मोदी समर्थक ?

अमेरिकेतील रमेश नून या आयटी प्रोफेशनल आणि मोदींच्या समर्थकाने ही सगळी व्यवस्था केली आहे. थिएटर मध्ये लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून एका स्क्रीनवर ६ ते ८ चॅनेल्सचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. रमेश नून यांच्या सांगण्यानुसार अमेरिकेत असं पहिल्यांदा होत आहे की, एखाद्या सिनेमागृहात भारतीय निवडणुकांच्या निकालाचे प्रक्षेपण होत आहे. त्यांनी याला “सिनेमा हॉल वॉच पार्टी” असे नाव दिले आहे.

किती आहे तिकीट ?

रमेश नून यांनी या सिनेमागृहात निकालांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी १५ अमेरिकन डॉलर (जवळपास १०४५ भारतीय रुपये) तिकीट ठेवले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार १५० तिकिटांची विक्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी रमेशच्या डोक्यात ही कल्पना आली होती. त्यांनी ही कल्पना सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारच्या वॉच पार्टी घरी किंवा हॉटेलात होत असतात, मात्र सिनेमागृहात पहिल्यांदाच होत असल्याचे भाजप विदेश मित्रमंडळ अध्यक्ष कृष्णा रेड्डी यांनी सांगितले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *