मोदींनी आपल्या नावासमोरून “चौकीदार” पदवी हटवण्याचे कारण काय सांगितले ?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या नावासमोरून चौकीदार पदवी काढून टाकली आहे. निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी “चौकीदार ही चोर है” हे कॅम्पेन चालवल्यानंतर त्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार लावले होते. त्यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करून यामागचे कारण सांगितले आहे. प्रधानमंत्र्यांचे हे ट्विट इंग्रजीमध्ये आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून इतरांनाही तसे करण्यास सांगितले आहे.

कशामुळे काढला नावातून चौकीदार शब्द ?

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता आपल्यातील चौकीदाराचे चैतन्य पुढच्या पातळीपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक क्षणी हा आत्मा जिवंत ठेवा आणि भारताच्या प्रगतीसाठी कार्य करत रहा. चौकीदार हा शब्द माझ्या ट्विटरच्या नावासमोरून हटत आहे, पण तो माझा अविभाज्य भाग बनून राहणार आहे. आपण सर्वांनीही तसेच करण्यास मी आपणास उद्युक्त करत आहे.”

मोदींच्या आवाहनानंतर भाजप अध्यक्ष अमित शहांपासून ते सुषमा स्वराज, स्मृती इराणी, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, पूनम महाजन, अवधूत वाघ, इत्यादी नेत्यांनीही आपल्या नावातून चौकीदार शब्द हटवला आहे. एकंदर विरोधकांच्या “चौकीदार ही चोर है” या कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी सुरु केलेले “मैं भी चौकीदार” हे कॅम्पेन चांगलेच यशस्वी झाले आहे. मोदींनी अगदी योग्य वेळी चौकीदार कॅम्पेनचे विसर्जन केले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *