जाणून घ्या मराठवाड्यातील ८ जागांवर सकाळी ११ वाजेपर्यंत कोणाला किती मते मिळाली?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए ३३५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही १०३ उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप २२ , शिवसेना २० , काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे.

सकाळी १०.३० पर्यंत हाती आलेल्या कालांनुसार देशासह महाराष्ट्रात देखील धक्कादायक निकाल हाती येताना दिसत आहेत. महाराष्ट्रात युतीच्या ३५-४० जागा तर आघाडीच्या १२-१८ जागा येतील असा अंदाज बऱ्यापैकी सर्वच एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं होतं. पण सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मात्र धक्कादायक निकाल येताना दिसत आहे.

मराठवाड्यातील ८ पैकी ७ जागांवर युतीचे उमेदवार पुढे आहेत. जाणून घेऊया सकाळी ११ पर्यंत उमेदवारांना मिळालेले मते-

औरंगाबाद- औरंगाबाद मध्ये धक्कादायक कल दिसत आहेत. चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. सकाळी ११ पर्यंत इम्तियाज जलील यांना ६०६३८ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर हर्षवर्धन जाधव आहेत. त्यांना ५८२२९ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरील चंद्रकांत खैरेंना ४७९९८ मते मिळाली आहेत. इथे काँग्रेसला फक्त १२ हजार मते मिळाले आहेत.

जालना- जालन्यात रावसाहेब दानवे जवळपास ३० हजार मतांनी पुढे आहेत. त्यांना ६५८०५ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या विलास औताडे यांना २६४३४ मते मिळाली आहेत.

परभणी- परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव हे १४ हजार मतांनी पुढे आहेत. त्यांना ६५७४० मते मिळाली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांना ५१८६८ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीला येथे १६६२८ मते मिळाली आहेत.

हिंगोली- हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना ४२८१२ मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना १९२४१ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने देखील १२ हजार मते घेतली आहेत.

नांदेड- नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे ११ हजार मतांनी पुढे आहेत. त्यांना १०९६५४ मते मिळाली आहेत. तर अशोक चव्हाण यांना ९५५९७ मते मिळाली आहेत. इथे वंचित बहुजन आघाडीने देखील मोठ्या प्रमाणात मते घेतली आहेत. VBA ला येथे ३६५१३ मते मिळाली आहेत.

उस्मानाबाद- येथे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे २० हजार मतांनी पुढे आहेत. त्यांना ११९२६४ मते मिळाली आहेत. रानाजगजीतसिंह यांना ९५८८२ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांना १९९५० मते मिळाली आहेत.

लातूर- लातूरमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना ७९९५२ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या गुणवंत कामत यांना ३६९२८ मते मिळाली आहेत. वंचितने येथे १३१७८ मते घेतली आहेत.

बीड- सकाळी ११ वाजेपर्यंत इथे भाजपच्या प्रीतम मुंडेंना १३८८९४ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना १००७९० मते मिळाली आहेत. वंचितला येथे १७४९४ मते मिळावी आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *