प्रधानमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या नितीन गडकरींचे जिंकतील का नाही ?

देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यास भाजपकडून नितीन गडकरी हे प्रधानमंत्री पदाचे दावेदार असतील अशा चर्चा कालपर्यंत रंगत होत्या. गडकरींचे इतर मित्रपक्षातील नेत्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध मोदींपेक्षा घट्ट असल्याने ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र मतदानानंतर नितीन गडकरींच्या जागेला दगाफटका होऊन ते पराभूत होऊ शकतो अशीही चर्चा रंगल्याने त्यांच्या निकालाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

गडकरींच्या समोरच्या अडचणी

नितीन गडकरी त्यांच्या पारंपरिक नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आवडते उमेदवार आहेत. गडकरींच्या आधी नागपुरवर १६ वर्षे काँग्रेसचा झेंडा होता. २०१४ मध्ये गडकरींनी काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांचा पराभव करून भाजपचा झेंडा लावला. यंदा ते भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोलेंविरोधात निवडणूक लढवत आहेत. पटोललेंनी त्यांना जोरदार टक्कर दिल्याची चर्चा आहे.

गडकरींच्या नागपूरची सद्यस्थिती काय आहे ?

त्रिशंकू परिस्थितीत प्रधानमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या भाजप उमेदवार नितीन गडकरींना दुपारच्या दीड वाजेपर्यंत १४५७२७ मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या नाना पटोलेंना ९०३३० मते मिळाली आहेत. इतर कुठलाही उमेदवार यांच्या जवळपास नाही. याचाच अर्थ गडकरींना ५५३९७ मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या अद्याप बऱ्याच फेऱ्या बाकी असल्याने मतांची आघाडी कमीजास्त होऊ शकते. पुढे काय होईल ते पाहण्यासारखे आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणी शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *