जाणून घ्या बारामतीच्या बहुचर्चित लढतीत दुपारी १२ वाजेपर्यंत कोणाला किती मते मिळाली?

देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास २०१४ च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. १२ वाजेपर्यंत काँग्रेसलाही महाराष्ट्रात एकाही जागेवर आघाडी नाहीये. तर राष्ट्रवादी ४ आणि वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे या विजयी होतात का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. जाणून घेऊया दुपारी १२ वाजेपर्यंत बारामतीत कोणाला किती मते मिळाली.

बारामतीत सुप्रिया सुळे या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडल्या होत्या. पण त्यांनी पुन्हा जोरदार मुसंडी घेतली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांनी 69 मतांची आघाडी घेतली आहे.

सुप्रिया सुळे यांना दुपारी १२ वाजेपर्यंत ३६०५१७ मते घेतली आहेत. तर भाजपच्या कांचन कुल यांना २९१३१४ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांना २१२४० मते मिळाली आहेत.

महाराष्ट्रातील आघाडीवर असणारे उमेदवार

पुणे – गिरीश बापट (भाजप)
नगर – सुजय विखे (भाजप)
बीड – डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)

नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
लातूर – सुधाकर शृंगारे (भाजप)
सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
रावेर – रक्षा खडसे (भाजप)
जालना – रावसाहेब दानवे (भाजप)

औरंगाबाद – इम्तियाज जलील (एमआयएम)
रायगड – अनंत गीते (शिवसेना)
माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगली – संजय काका पाटील (भाजप)
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर – संजय मंडलिक (शिवसेना)
धुळे – सुभाष भामरे (भाजप)

नाशिक – हेमंत गोडसे (शिवसेना)
शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (शिवसेना)
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिवसेना)
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन (भाजप)

मुंबई पूर्व उत्तर – मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी (भाजप)
ठाणे – राजन विचारे (शिवसेना)

कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
भिवंडी – कपिल पाटील (भाजप)
पालघर – राजेंद्र गावित (शिवसेना)
नंदुरबार – हिना गावित (भाजप)
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
जळगाव – उन्मेश पाटील (भाजप)

उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
दिंडोरी – भारती पवार (भाजप)

हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)
वर्धा – रामदास तडस (भाजप)
रामटेक – कृपाल तुमाने (शिवसेना)
भंडारा गोंदिया – सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली चिमूर – अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर – हंसराज अहिर (भाजप)

यवतमाळ वाशीम – भावना गवळी (शिवसेना)
परभणी – संजय जाधव (भाजप)
बुलडाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला – संजय धोत्रे (भाजप)
अमरावती – आनंदराव आडसूळ (शिवसेना)
हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *