११०७ कोटींची संपत्ती असणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मते बघून तुम्ही म्हणाल हसावं का रडावं !

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहेच, त्याबरोबरच भाजपला स्वबळावर सत्तास्थापनेचा दावा करता येईल इथे स्पष्ट बहुमतही मिळाले आहे. ही झाली निवडणूक निकालाची गोष्ट ! याबरोबरच देशातील एका सर्वात श्रीमंत उमेदवाराला या निवडणुकीमध्ये आलेल्या वेगळ्या अनुभवाचीही चर्चा आता रंगत आहे. तब्बल ११०७ कोटींची संपत्ती असणाऱ्या या उमेदवाराला निवडणुकीत फक्त १५५१ मते मिळाली आहेत.

कोण आहे हा दुर्दैवी उमेदवार ?

बिहारच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून रमेश कुमार शर्मा नावाचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांचे नाव समोर आले होते. त्या मतदारसंघातून भाजपचे राम कृपाल यादव आणि राष्ट्रीय जनता दल उमेदवार मिसा भारती यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत होते. त्याठिकाणी भाजपचे राम कृपाल यादव निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.

इंजिनियर आणि उद्योजक आहेत रमेश कुमार शर्मा

६३ वर्षांचे रमेश कुमार शर्मा जहाज पुनर्नवीकरणाच्या कंपनीचे मालक आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचे निवडणूक चिन्ह सुद्धा जहाजच होते. स्वतःला ते भगतसिंगांच्या अनुयायी सांगतात. प्रचारादरम्यान त्यांच्या टोपीवर भगतसिंगांचा फोटो लावलेला असायचा. आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी ४७ आश्वासने दिली होती. आज रमेश कुमार शर्मांच्या मालकीच्या ११ कंपन्या आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांनी बिहार विधानसभेची निवडणूक लढवली होती.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *