वेश्याव्यवसाय बंद केल्यावर कुठे जातात सेक्सवर्कर?

वेश्यांचे आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा अगदी वेगळे आणि अत्यंत भयानक असते. तरुणपणात या सेक्स वर्करना अनेक यातना आणि जुलूम सहन करावा लागतो. उतरत्या वयात त्यांचे जीवन अजूनच दयनीय होते. व्यवसाय करत असताना सेक्स वर्करला एक भीती नेहमीच वाटत असते की, असा एखादा दिवस येऊ नये ज्यादिवशी दरवाजात गिऱ्हाईक उभे नसेल.

पण याच महिलांच्या आयुष्यात एक दिवस असा येतो, ज्यादिवशी त्यांना जाणवतं की आपलं तारुण्य ढळलं आहे आणि आपण म्हातारे व्हायला लागलो आहोत.

आपण विचार केला का की वय उतरल्यानंतर या महिला काय करतात ?

नुकतेच काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनजवळ जीबी रोडवर एक वृद्ध महिला अत्यंत मळकट कपड्यात आढळून आली. इथून जवळच असणाऱ्या एका भागात वेश्याव्यवसाय चालतो. त्या वृद्ध महिलेला ती इथे काय करत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर तीने सांगितले की, वय वाढल्यानंतर आणि तारुण्य कमी झाल्यानंतर माझ्यासारख्या सर्व वेश्यांना कोठ्यातून बाहेर काढले जाते.

आयुष्याच्या शेवटच्या काळात काय होते या वेश्यांचे ?

वेश्यांना राहण्याठी घर नसल्याने त्यांना कोठ्यातून बाहेर काढल्यानंतर रस्त्यावरच्या फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशनवर झोपावे लागते. त्यांच्याकडे पैसे नसल्याने अशा महिला भीक दारोदारी मागून आपले पोट भरत असतात.

त्यांचे कुटुंब नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारेही कुणी नसते. कित्येकदा आजारी पडून किंवा उपासमारीनेच या वेश्या लावारीसपणे आपला प्राण गमावतात. सरकार आणि प्रशासनसुद्धा वेश्यांच्या पुनर्वसनासाठी काही पावले उचलत नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *