नरेंद्र मोदी वापरतात हे सिमकार्ड, घड्याळ, पेन आणि चष्मा ! एवढी आहे किंमत..

भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पाच वर्ष प्रधानमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी नरेंद्र मोदींना मिळाली. मोदी आपल्या भाषणांमुळे कायम चर्चेत राहतात. कपड्यांमधील फॅशन सेन्सच्या बाबतीत मोदी देशात लोकप्रिय आहेत. म्हणून तर २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर देशात मोदी जॅकेट फॅशनचा भाग बनला होता. मोदी केवळ कपड्यांच्या बाबतीतच नाही, तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही ते सजग असतात. आज आपण मोदी त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या वस्तू वापरतात ते जाणून घेऊया…

१) घड्याळ

नरेंद्र मोदींच्या बायोग्राफीनुसार त्यांना मोवाडो (Movado) ब्रॅण्डची घड्याळे घालायला आवडतात. मोवाडो ही स्वित्झर्लंडची लक्सझरियस घड्याळाची कंपनी आहे. मोदी आपल्या मनगटावर हे घड्याळ बांधताना त्याची डायल खालच्या बाजूला ठेवतात. ते याला शुभ मानतात.

२) पेन

नरेंद्र मोदी जर्मनीच्या प्रसिद्ध अशा मों ब्लां कंपनीचा पेन वापरतात. या पेनाची किंमत एल लाख तीस हजार रुपये आहे. या कंपनीने आपल्या १४ लाख रुपयांच्या पेनावर महात्मा गांधींचे नाव आणि फोटो वापरल्याने मोठा वाद झाला होता.

३) सिमकार्ड

मोदींच्या हातातील आयफोन आपण अनेकदा पाहिला आहे. आपल्या आयफोनमध्ये मोदीजी वोडाफोनचे सिमकार्ड वापरतात. ही बाब तेव्हा समजली जेव्हा मोदींनी त्यांच्या मोबाईल मधून एक स्क्रिनशॉट काढून शेअर केला होता.

४) चष्मा

मोदींना सनग्लासेस घालायला आवडते. ते बुल्गरी ब्रॅण्डचा चषमा वापरतात. बुल्गरी ही इटलीची कंपनी असून ती सामान्यपणे ज्वेलरी बनवण्याचे काम करते. पण आता ती घड्याळे, परफ्युमही बनवायला लागली आहे. त्यांच्या चष्म्याची किंमत ३० ते ४० हजार असते.

५) कपडे

असं सांगतात की माणसाने आपला टेलर, सलूनवाला आणि डॉक्टर कधी बदलू नये. नरेंद्र मोदींनाही यावर विश्वास असल्याचे दिसते. १९८९ पासून मोदी आजही अहमदाबाद येथील चौहान टेलर यांच्याकडेच कपडे शिवतात.

६) आरोग्य

मोदी नियमित योगा करतात. इतरही व्यायाम करतात. पण एक विशेष बाब म्हणजे मोदी कधीही थंड पाणी पीत नाहीत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *