३००० हुन अधिक निराधार मुलींची लग्न लावून देणारा हिरा व्यापारी !

सुरतच्या सावजी ढोलकीया या हिरा व्यापाऱ्याबद्दलचे किस्से आपण ऐकलेच असतील. तेच जे दिवाळीला आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कधी गाडी तर कधी घरच बोनस म्हणून गिफ्ट देतात.

परंतु यावेळेस सुरत मधील अजून एक हिरा व्यापारी सध्या चर्चेमध्ये आहेत. ते सद्गृहस्थ निराधार मुलींची लग्न लावून देतात. मागच्या १० वर्षात त्यांनी आतापर्यंत ३०९७ मुलींचे कन्यादान केले आहे. आज अशा या दिलदार व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊया…

कोण आहेत ते हिरा व्यापारी ?

महेशभाई सवाणी नावाचे हिरा व्यापारी आपल्या देशातील निराधार मुलींच्या प्रति पालकाच्या कर्तव्याची भावना जपतात. त्यांनी आतापर्यंत ३०९७ निराधार मुलींचे लग्न लावून दिले आहेत. लग्न लावून देताना ते मुलीची जात किंवा धर्म बघत नाहीत. गतवर्षी २३ डिसेंबरला त्यांनी पी. पी. सवाणी विद्या संकुलात २३१ मुलींची लग्ने लावली; त्यात ६ मुस्लिम आणि ३ ख्रिश्चन मुली होत्या.

लग्नानंतर घेतात मुलीची सर्व जबाबदारी

मुलींच्या लग्नानंतरही महेशभाई मुलींच्या सगळ्या गरजा, त्यांच्या मुलाबाळांचा जन्म, आरोग्य, शिक्षण याची जबाबदारी घेऊन मदत करतात. एवढेच नाही तर एखाद्या मुलीला लहान बहीण असेल तर तिचीही ते जबाबदारी घेतात.

दाम्पत्याला सरकारी योजनांचा लाभ तसेच जावयाला रोजगारासाठीही ते मदत करतात. त्यांनी मुलींना दत्तक घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे मागणी केली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *