कधी दिल्लीत गेलात तर इथे घ्या सर्वात स्वस्त कपडे

शॉपिंग करायला कुणाला आवडत नाही ! विशेषतः महिलांना तर शॉपिंग म्हणलं की कुठे जाऊ आणि कुठे नको असे होते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आठवण म्हणून तिथे शॉपिंग केली जाते. मात्र दिल्लीत शॉपिंग करण्याची वेगळीच मजा असते. आज आपण दिल्लीतील अशा कापड बाजारांविषयी जाणून घेणार आहोत, जिथे आपल्याला स्वस्त आणि चांगल्या कपड्यांची शॉपिंग करता येईल.

१) नेहरू प्लेस मार्केट – दिल्लीतील हा भाग जास्तकरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. मात्र इथे असणाऱ्या कपड्यांच्या दुकानांमध्ये थेट मिल मधून कपडे येतात, जे आपल्याला होलसेल भावात विकत मिळतात. दिल्लीतील हा सर्वात कापड बाजार आहे. रविवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

२) सेंट्रल मार्केट, लाजपतनगर – उत्तम शॉपिंग आणि हरप्रकारच्या स्टाईलचे कपडे खरेदी करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. इथे तुम्हाला सुई पासून कपड्यांच्या मॉल पर्यंत सर्वकाही भेटेल. सोमवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

३) मोहनसिंग प्लेस – कॉलेजला असणाऱ्या तरुण वर्गाच्या आवडीचे हे ठिकाण आहे. इथे वेस्टर्न पासून ट्रॅडिशनलपर्यंत सगळ्या अद्ययावत फॅशनचे कपडे मिळतात. आपल्या आवडत्या ब्रँडचे टॅग इथे कपड्यावर शिलाई करून दिले जातात. रविवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

४) ज्वाला हेडी मार्केट – प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी इथे येऊन स्वस्त शॉपिंगची मजा लुटता येते. शूटिंग-शर्टींग कापड आणि वेगवेगळ्या स्टाइलच्या जीन्स इथे मिळतात. इथे असणाऱ्या डायच्या दुकानांमध्ये आपल्याला हवा तो रंगही कपड्यांना लावून घेता यतो. बुधवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

५) शंकर मार्केट – कॅनॉट प्लेसच्या अगदी समोर असणारा शंकर मार्केट हा कापड आणि पारंपरिक वस्त्रांचे सर्वात मोठे मार्केट आहे. इथल्या कपड्यांसारखी क्वालिटी आणि डिझाईन दिल्लीच्या इतर कुठल्या मार्केटमध्ये मिळत नाही. रविवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

६) एम्पोरिया कॉम्प्लेक्स – कुटिरोद्योग आणि ग्रामीण हॅण्डमेड वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे कॉम्प्लेक्स उघडण्यात आले आहे. इथे हॅन्डलूमच्या विविध प्रकारांसोबतच अनेक पारंपरिक भरतकाम केलेली वस्त्रेही मिळतात. रविवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

७) किनारी बाजार आणि कटरा निल, चांदणी चौक – शॉपिंगचा विषय असेल तर चांदणी चौकाचे नाव आल्याशिवाय राहत नाही. इथल्या किनारी बाजार आणि कटरा निल मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या फॅब्रिक, पॅचवर्क, गोटा आणि सर्व एक्सेसरी मिळतात. रविवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

८) शांती मोहल्ला सिलमपूर – बल्कमध्ये ड्रेस शिवण्यासाठी स्वस्त कापड खरेदी करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. अनेक कट पिसेस इथे किलोच्या दरात मिळतात. इथे वेगवगेळे डिझायनर्स शॉपिंगला येतात. सगळ्या प्रकारची कापड इथे मिळतात. सोमवार सोडता आठवडाभर सकाळी ११ ते रात्री ९ हे मार्केट चालू असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *