राजीव गांधी यांच्या बाबत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे का ?

राजीव गांधी उर्फ राजीव रतन गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला मुंबई येथे झाला. फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी. भारताचे ७ वे प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा कार्यकाल १९८४ ते १९८९..

आपल्या मोठ्या भावासोबत राजीव गांधी यांनी प्राथमिक शिक्षण ड्युन स्कूल,देहरादून येथे पूर्ण केले त्यानंतर , Trinity College मध्ये त्यांचे शिक्षण झाले व पुढील शिक्षणा करिता ते Cambride Imperial Collge लंडन येथे पूर्ण केले. इंदिरा गांधीची हत्या झाल्या बरोबर त्यांना भारताचे प्रधानमंत्री घोषित करण्यात आले. त्यांचे भाऊ संजय गांधी यांच्या मृत्यू नंतर त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला.

राजीव गांधी यांचे नाव राजीव कसे ठेवण्यात आले ?

त्यांची आजी कमला गांधीच्या नावावरून त्यांचे नाव राजीव ठेवण्यात आले कारण असे कि कमला म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचे सिंहासन कमळ म्हणजे राजीव… वयाच्या ४० व्या वर्षी प्रधानमंत्री पदाची शपथ घेणारे राजीव गांधी हे सर्वात तरून भारताचे प्रधानमंत्री होते.

राजीव गांधी यांचे प्रेम Antanio Manio (त्यांना आपण सध्या सोनिया गांधी म्हणून ओळखतो ) यांच्या सोबत झाले त्यानंतर दोघानेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. UKमध्ये college मध्ये असताना दोघाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. १९६६ ला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजीव गांधी भारतात परतले व त्यांनी एअर इंडियात पायलटची नौकरी केली. येथे त्यांना ५००० रुपये महिन्याला पगार मिळत होता. राजीव गांधी हे संगीताचे चाहते होते Rolling Stones व Beetles हे त्याचे आवडते संगीत समूह होते.

१९८० पर्यंत संजय गांधी यांच्या मृत्यु होण्यापूर्वी राजीव गांधी राजकारणापासून दूर होते. भावाच्या मृत्य नंतर राजीव गांधी १९८१ साली सर्वात पहिले लोकसभेवर निवडून आले. Sam Pitroda सुध्दा मान्य करतात कि भारतातील डिजिटल क्रांतीचे जनक हे राजीव गांधी आहे.

१९८२ साली त्यांना कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. याच काळात त्यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची तयारी करण्याची जवाबदारी देण्यात आली व त्यांनी ती जवाबदारी सार्थपणे पार पाडली. आईच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी कॉंग्रेसला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. ५४२ पैकी ४११ जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले.

निवडणूक प्रचारात त्यांनी २५० सभा घेतल्या व त्याचे अंतर पृथ्वीच्या अर्धी परिक्रमा होईल एवढे होते. ३० जुलै १९८७ रोजी त्याचावर प्राणघातक हल्ला झाला परंतु राजीव गांधी या हल्ल्यातून बचावले. विजयमुनिगे रोहणा डिसिल्वा हे हल्ला करणार्याचे नाव कारण २९ जुलै १९८७ रोजी त्यांनी श्रीलंका सोबत झालेला शांती प्रस्ताव आहे.

राजीव गांधी यांना २१ मे ११९१ रोजी चेन्नई येथील श्रीपेरूमब्दूर येथील सभेत आत्मघाती बॉम्ब हल्यात वीरगती प्राप्त झाली. LITTE ह्या दहशतवादी संघटने तर्फे हा हल्ला करण्यात आला. १९९१ साली त्यांना मृत्यूपश्चात भारतातील सर्वोच्च सन्मान भारत रत्न देण्यात आला.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *