ढोल ताशा पथकातील मुलाचे मनोगत महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने वाचलेच पाहिजे

नमस्कार मित्रांनो,

मी अमन जायभाये शिवप्रताप ढोल ताशा पथक नागपूर मधला (प्रमुख ताशा वादक) मी किशोर दिकोंडवार यांना मागिल दोन वर्षा पासुन ओळखतो. माझी ओळख वैभवजी मस्के यांच्या मार्फत झाली.

रामनवमी निमीत्य झारखंड रांचीला वादन होते. त्या वादनाला जात असताना भिलाई ते रायपुर या मार्गावर माझा रेल्वे मधुन अपघात झाला. मला भिलाई येथे प्रथमोपचारा करीता दवाखाण्यात नेण्यात आले, आणि प्रथमोपचार करत असताना डाॅक्टरांनी मला भरती व्हायचा सल्ला दिला. तरी मला तिथे भरती न करता सरळ नागपुरला हलवण्यात आले. मला रात्री 2:00 ते 3:00 च्या सुमारास घरी आणले. घरी आणल्यावर माझ्या आई कडुन भिलाई दवाखाना मधला झालेला प्रथमोपचाराचा आणि रुग्णवाहिकेचा खर्च तसेच रांची ला परत जाण्याचा विमानाचा खर्च हा पथक संस्थापक किशोर दिकोंडवार यांनी माझ्या आई कडुन घेतला.

पण मित्रांनो तुम्ही मला एक सांगा, आज माझी आई चांगल्या नोकरीवर आहे म्हणून आज माझा जिव वाचू शकलं. याच ठिकाणी जर माझ्या जागी पथकाचा गरिब मुलगा असता तर तो पैसे लावू शकला असता का ???

शिवप्रताप ढोल ताशा पथकाचे संस्थापक किशोर दिकोंडवार व पथक प्रमुख स्वत:च घर आणि स्वत:चे कर्ज फेडण्या करीता पथक चालवतात तर हे काय कोणाला पैसे लावणार, सगळे पैसे आपल्या कर्ज फेडण्या करीता लावतात. या पथकात मी मागिल दोन वर्षात कुठलेही सामाजिक कार्य अथवा पथकाचा वार्षिक उत्सव बघितलेला नाही.आता पर्यंत माझ्या उपचाराला 1:30 लाखा वरचा खर्च झालेला आहे. याच ठिकाणी गरिब मुलगा असता तर तेच काय झाल असत मित्रांनो ???

या पथकामधे फक्त स्वत:ला आणि पैसाकडे बघितला जातो. आम्ही पथकामध्ये प्रवेश करत असताना असे सांगण्यात आले होते कि, इथे सगळे भाऊ-बहिणचे नात असेल, परंतु इथे अस काही नाही इथे फक्त Girlfriend आणि Boyfriend हे नात वापरण्यात येत.

माझा अपघात झाला असतांना तरी सुद्धा या लोकांनी जावून वादन केले. या पथकात जिवाची परवा न करता फक्त पैसा कमवण्यासाठी पथक चालवला जातो. एवठ माझं अपघात जिवावर असताना मला पथक अध्यक्ष (प्रमुख) प्रणित पोचंपल्लीवार बघायला आले नाही.

मित्रांनो, मी एवढच म्हनणार शिवप्रतापमध्ये जे कोणी असेल त्यांनी ही शिकवण घ्यायला हवी. जे द्रूश्य माझ्यासोबत घडले ते तुमच्या सोबत पण होऊ शकत बरं…

आता माझ्यावर अपंगत्व आढावलेला आहे याला कारणीभूत कोण??

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *