बॉलीवूडमध्ये जाण्यासाठी ऑडिशनला कराव्या लागतात या विचित्र गोष्टी!

फिल्म इंडस्ट्री मध्ये एंट्री करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण ती एंट्री म्हणावी तेवढी सोपी नसते. ऑडिशनला कलाकारांना काय काय करावे लागते हे तुम्हाला कळले तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण ऑडिशन म्हटले की, एखादे भावुक अथवा कॉमिक दृश्य करून दाखवायचे एवढेच आपल्याला माहीत असते. पण काही चित्रपटांच्या ऑडिशन्सच्यावेळी कलाकारांकडून अतिशय वेगवेगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात असे अभिनेत्री आदिती राव हैदरीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे.

यापूर्वी अनेक कलाकारांनी आपल्याला ऑडिशनच्या वेळेला आलेले विचित्र अनुभव सांगितलेले आहेत. अदितीने सन २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली 6’ मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती.

अदिती जास्त चित्रपटात दिसली नाही. २०१८ मध्ये आलेला ‘दासदेव’ हा तिचा बॉलिवूडमधला अखेरचा चित्रपट होता. सध्या ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम करताना दिसत आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

तिने तिच्या एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी नुकत्याच मीडियाला मुलाखती दिल्या आहेत. एका मुलाखतीच्या दरम्यान आदितीने एका ऑडिशच्या दरम्यानचा तिला आलेला एक अनुभव सांगितला आहे.

आदितीला एका चित्रपटाच्या ऑडिशनच्यावेळेस चक्क इंटिमेंट दृश्य करून दाखवण्यास सांगितले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले होते. याविषयी आदिती सांगते, मला ऑडिशनमध्ये एका मुलासोबत इंटिमेंट दृश्य करण्यास सांगितले होते. हे दृश्य ज्या मुलासोबत करण्यास सांगितले त्या मुलाला मी ओळखत देखील नव्हते. हे काय सुरू आहे हेच मला कळत नव्हते. तो मुलगा अतिशय उंच होता. तसेच तो खूपच विनम्र होता.

आदितीच्या दुसऱ्या चित्रपटाच्या म्हणजेच ये साली जिंदगी या चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळी ही गोष्ट घडली होती. असाच काहीसा अनुभव राधिका आपटेला देखील आलेला आहे. दमदार अभिनय आणि सडेतोड मत मांडून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री राधिका आपटेने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

‘देव डी’ या चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये राधिका आपटेला फोन सेक्स करावा लागला. या ऑडिशननंतर मात्र मी असे प्रकार पुन्हा केले नाही, असे तिने म्हटले होते. माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी यापूर्वी कधीही असं केलं नव्हतं. पण तो सीन करताना मजा आली. मात्र, त्या चित्रपटासाठी माझी निवड झाली नाही, असे तिने सांगितले.

आयुषमान खुराणाला देखील असाच धक्कादायक अनुभव आला होता. आयुषमान खुराणा एका चित्रपटाच्या ऑडिशनला गेला होता. त्यावेळी तिथं असणाऱ्या कास्टींग डायरेक्टरने त्याला गुप्तांग दाखवण्यास सांगितले. ही विचित्र मागणी ऐकून आयुषमानने हा चित्रपट करण्याचा विचार सोडून दिला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *