विवेक ओबेरायने केलेले हे कृत्य बघून तळपायातील आग मस्तकात जाईल..

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले.

पण या सर्व प्रकारात विवेक ओबेरॉय याने मात्र विकृतीची हद्द ओलांडली.त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वर एक ट्विट केली आहे ज्यात त्याने ऐश्वर्या राय वर शिंतोडे उडवले. विवेक ओबेरॉय च्या ट्विट मध्ये ऐश्वर्या व सलमान खान चा फोटो त्यावर ओपिनियन पोल लिहिले आहे.तर दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या व फोटोवर Exit poll लिहिले आणि शेवटी निकाल असे लिहून त्यात ऐश्वर्या अभिषेक व आराध्य यांचा फोटो घेतला..

ओबेरॉय ची ही कृती अत्यंत विकृतपणाची होती यावर त्याने जे काही ट्विट केले त्याचा अर्थ असा की एक महिला कोणासोबत ही फिरू शकते पण शेवटी त्याच्यासोबत लग्न होते ते खरे असते. त्यामुळे पोल वर विश्वास न ठेवता निकाला ची वाट पहा.

विवेक ओबेरॉय याने नेमकाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बायोपिक बनवला आहे. पण त्या फिल्म ला निवडणूक असल्याने रिलीज होऊ दिले नाही. पण या फिल्म मधील नरेंद्र मोदी हे अजूनही विवेक ओबेरॉय च्या अंगात घुसलेले आहेत अशीच त्याची वागणूक आहे. अशी त्यांच्यावर टीका होत आहे.

ओबेरॉय यांच्या ट्विट वर अनेक मान्यवरांनी आक्षेप घेतला आहे त्याला खडे बोल सुनावले आहेत. पण त्याचे डोळे अजूनही उघडले नाहीत. महिला आयोगाने सुद्धा विवेक ओबेरॉयच्या या कृतीवर तीव्र नाराजी दर्शवली आहे त्याला त्याबद्दल नोटीस सुद्धा पाठवली.

एका विवाहित स्त्रीच्या जीवनावर या प्रकारची टिप्पणी करणे अत्यंत चुकीचं आहे. त्याबद्दल विवेक ओबेरॉय याने माफी मागितली पाहिजे अशी अनेकांची भूमिका आहे पण सध्यातरी ओबेरॉय हा यासर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करतो आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *