तुम्हाला माहित आहे का आपल्या एका मतासाठी निवडणूक आयोग किती खर्च करतो ?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. देशाच्या निवडणूक प्रक्रियेत आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. मतदारांच्या वयापासून मतदान यंत्रापर्यंत आणि प्रचाराच्या माध्यमांपासून प्रचाराच्या मुद्द्यांपर्यंत सगळं काही बदलत चालले आहे. हे सगळं होत आलंय ते मतदारांनी येऊन मतदान करण्यासाठी ! पण तुम्हाला माहित आहे का, की मतदाराच्या एका मतासाठी निवडणूक आयोग किती खर्च करत असतो ? नाही ना ! चला तर मग जाणून घेऊया…

निवडणूक आयोग नेमका कोणत्या गोष्टींवर खर्च करतो ?

निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकांपूर्वी, निवडणुकांच्या काळात आणि निवडणुकांनंतर मतमोजणी होईपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च करत असतो. त्यामध्ये मतदार नोंदणी पासून मतदार जनजागृती, मतदान, मतमोजणी आणि आचारसंहिता दरम्यान लागणारे मनुष्यबळ, कर्मचारी, सुरक्षा यासाठी खर्च केला जातो.

त्याशिवाय निवडणूक प्रक्रियेमधील वेगवेगळ्या सुविधा, प्रवास, छपाई, विविध माध्यमांतील जाहिराती, इत्यादि वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे. हा सर्व खर्च निवडणूक आयोगाकडून केला जातो.

प्रति मतासाठी ६० पैसे वरुन आज प्रति मतासाठी ७२ रुपये खर्च ?

आज भारतात असणाऱ्या जवळपास ९० कोटी मतदारांचा विचार करता एकूण मतदारांच्या संख्येच्या बाबतीत भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणुक आहे. काळानुसार निवडणूक आयोगाला निवडणुकीसाठी लागणाऱ्या खर्चातही वाढ करावी लागली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या २६ मार्च २०१९ च्या बातमीनुसार १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रति मतासाठी ६० पैसे खर्च आला होता. तोच खर्च १९९१ मध्ये ७.०२ रुपये, २००४ मध्ये १५.१३ रुपये आणि २०१४ मध्ये ४६.४० रुपये इथपर्यंत वाढला होता. लोकसभा निवडणुकीचा वाढता खर्च पाहता एका अनुमानानुसार यावर्षी प्रति मतासाठी ७२ रुपये खर्च येणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *