पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली त्या केदारनाथच्या गुहेत तुम्हीही राहू शकता! जाणून घ्या खर्च

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. शेवटच्या टप्प्त्याचे मतदान पार पडण्याआधी पंतप्रधान मोदी इथे आले होते. इथे त्यांनी रात्रभर गुहेत ध्यानधारणाही केली. ज्या ठिकाणी मोदींनी ध्यानधारणा केली ती गुहा केदारनाथ मंदिराच्या डावीकडे डोंगरात तयार करण्यात आली आहे.

आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या गुहेत राहून आल्यामुळे या गुहेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि लोकांमध्ये याबाबत उत्सुकताही वाढली. महत्त्वाची बाब म्हणजे ही गुहा तुम्ही सुद्धा बुक करू शकता आणि इथे जाऊन ध्यानधारणा करू शकता. या गुहेत राहण्यासाठी तुम्हाला किती खर्च येईल जाणून घेऊया खासरेवर..

केदारनाथमधील ही गुहा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रूंद आहे. या गुहेला रुद्र गुहा या नावाने ओळखले जाते. ही गुहा तयार करण्याचं काम एप्रिलमध्ये करण्यात आलं होतं आणि यासाठी साडे आठ लाख रूपये खर्च करण्यात आले. या गुहेचं तुम्ही ३ दिवसांसाठी बुकिंग करू शकता. नेहरू गिर्यारोहण संस्थेने या गुहेची निर्मिती केली असून केदारनाथमध्ये अशाप्रकारच्या पाच गुहा तयार करण्यात आल्यात.

हि एक गुहा अगोदर ट्रायलसाठी तयार करण्यात आली होती. इथे असलेला ३ दिवसांचा बुकिंग कालावधी वाढवता येतो. बुकिंग करणाऱ्या व्यक्तीचं आधी गुप्तकाशीमध्ये मेडिकल चेकअप केलं जातं त्यानंतर पुन्हा केदारनाथमध्ये मेडिकल चेकअप होते.

काय आहेत गुहेत व्यवस्था?

गुहा समुद्र सपाटीपासून साधारण १२, २५० फूट उंचीवर आहे. ही गुहा केदारनाथ मंदिरापासून साधारण २ किमी अंतरावर तयार करण्यात आली आहे. तर या गुहेत काही आवश्यक सुविधाही देण्यात आल्या आहेत. गुहेत बेड, टॉयलेट, वीज आणि टेलिफोनसारख्या आधुनिक सुविधा आहेत.

एका दिवसाचा खर्च किती?

९९० रूपयात एक दिवसाचं बुकिंग ठेवण्यात आलं आहे. जीएमवीएनकडून एकावेळचं जेवणही दिलं जाणार आहे. यासाठी वेगळे पैसे घेतले जातील. दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने ध्यान केंद्रापर्यंत जाणार रस्ता पूर्णपणे बर्फाने झाकला गेला आहे. gmvnl.in या वेबसाईटवर तुम्ही करू शकता बुकिंग.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *