कोणकोणत्या कॅन्सर प्रतिबंधक गोळ्यांच्या किंमती ८७% कमी झाल्या ?

भारतात कॅन्सर म्हणजेच कर्करोगाने बाधित असणाऱ्या रोग्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. गरीब असो व श्रीमंत, सगळ्यांनाच या रोगाची काळजी आहे. मागच्या काही वर्षापासून कॅन्सर हाच भारतातील प्रमुख रोग बनला आहे. कॅन्सरसारख्या असाध्य रोगावर इलाज करणे सर्वांनाच शक्य होत नाही. याचा विचार करून शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार कॅन्सर प्रतिबंधक अशा ९ प्रमुख औषधी गोळ्यांच्या किंमती ८७% पर्यंत कमी केल्या आहेत. जाणून घेऊया त्याविषयीच…

कॅन्सरच्या उपचारात उपयोगात येणाऱ्या ५०० मिलिग्रॅम Pemetrexed इंजेक्शनची पूर्वीची किंमत २२००० रुपये होती, आता तेच इंजेक्शन २८०० रुपयांमध्ये मिळणार आहे. १०० मिलिग्रॅम Pemetrexed इंजेक्शनसाठी पूर्वी ७७०० रुपये किंमत मोजावी लागायची, ज्यासाठी आता केवळ ८०० रुपये खर्चावे लागतील. तसेच Erlotinib 100mg या कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या एका स्ट्रीपची किंमत पूर्वी ६६०० रुपये होती, आता तीच स्ट्रीप १८४० रुपयंत मिळणार आहे.

नॅशनल फार्मासुटिकल प्रायजिंग ऑथॉरिटीने फेब्रुवारीमध्ये कॅन्सरवरील ४२ नॉन-शेड्युल्ड औषधांच्या विक्रीवरील ट्रेंड मार्जिन ३०% केले आहे. या निर्णयामुळे ८ मार्च २०१९ पासून कॅन्सरवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमती ८७% पर्यंत कमी होणार आहेत.

किंमती कमी झालेल्या औषधांची नावे वाचा आणि मेडिकलमध्ये खरेदी करताना योग्य सवलत दिली आहे का ते तपासून पहा.- Azacitidine, Bendamustine Hydrochloride, Bortezomib, Crizotinib, Cytarabine, Dasatinib, Decitabine, Doxorubicin HCI Pegylated Liposomal Injection, Enzalutamide, Epirubicin, Eribulin mesylate, Erlotinib HCI, Estramustine phosphate, Everolimus, Exemestane, Fulvestrant, Irinotecan HCI Trihydrate, Lapatanib,

Leuprolide acetate depot for Injection, Lomustine, Mitoxantrone, Nilotinib, Plerixafor, Carfilzomib, Cladribine, Triptorelin, Pomalidomide, Osimertinib, Pegasperagase, Regorafenib, Ribociclib, Clofarabine, Sunitinib, Olaparib, Olaratumab, Paclitaxel (Protein-bound particles), Cabazitaxel, Bevacizumab, Lenalidomide, Pegfilgrastim, Mitomycin, Pemetrexed.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *