एकाच दगडात बनले आहे महाराष्ट्रातील हे मंदिर ! वाचा कधी आणि कशी झाली निर्मिती ?

महाराष्ट्रात कुठे आहे हे मंदिर ?

महाराष्ट्रातील औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर असणाऱ्या वेरूळ येथे बौद्ध, हिंदू आणि जैन काळात निर्माण केलेल्या जगप्रसिद्ध ३४ लेण्या आहेत. यातील १६ व्या कैलास लेण्यात हे कैलास मंदिर असून त्याची निर्मिती एकाच दगडात करण्यात आली आहे. मंदिराचे काम डोंगराच्या पठारावरून खाली म्हणजेच “आधी कळस मग पाया” असे झाले आहे. कैलास मंदिराकडे पाहून वेरूळ लेण्यांचे खोदकाम कसे झाले असावे याची कल्पना येते. जगातील सर्वात मोठी एकसंध रचना म्हणून या मंदिराकडे पहिले जाते.

कशी आहे रचना ?

मंदिराचे काम डोंगराच्या पठारावरून खाली म्हणजेच “आधी कळस मग पाया” असे झाले आहे. दगड कापून, त्यांना घडवून मंदिर, दरवाजा, खांबावर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिरात पावसाचे अतिरिक्त पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे मंदिर दोन मजली आहे. मंदिराच्या बाहेरचे पटांगण इंग्रजी U आकाराचे असून तीन विशालकाय स्तंभांनी घेरलेले आहे. शिवमंदिराच्या बाहेर विशालकाय नंदीची मूर्ती बनवण्यात आली आहे. मंदिराच्या चारी दिशांना हत्तीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शंकराची विशाल पिंड आहे.

कधी आणि कशी झाली निर्मिती ?

कैलास मंदिराची निर्मिती ८ व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झाली आहे. कैलास पर्वत हे भगवान शंकर पार्वतीचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे कैलास मंदिराची निर्मिती करताना तो कैलास पर्वताच्या समरूप दिसेल याची काळजी घेण्यात आली आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी ४ लाख टन दगड फोडावे लागले असण्याची शक्यता आहे.

या मंदिराच्या निर्मितीसाठी २० वर्ष लागले. आजच्या काळात असे मंदिर बनवायचे म्हणले तर शेकडो ड्रॉईंग, 3D डिझाईन व CAD सॉफ्टवेअर, शेकडो इंजिनिअर, कित्येक मोठमोठ्या मशिनी लागतील. यापैकी काही नसताना त्याकाळात या मंदिराची निर्मिती एवढी कलाकुसरीने कशी केली असेल हे एक आश्चर्यच आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *