महाराष्ट्र एकीकरण समितीचा वाघ हरवला, आमदार संभाजी पाटलांचे दुःखद निधन !

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव, संकेश्वर, निपाणी, बिदर, भालकी हा मराठी भाषिकांचा परिसर महाराष्ट्रात सामील झालाच पाहिजे ही अनेक वर्षांची मागणी आहे. या मागणीसाठी हिरीरीने लढणारे नेते आमदार संभाजी पाटील यांचे १७ मे २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. सीमाभागातील मराठी भाषिकांचा वाघ हरपल्याने बेळगाव आणि महाराष्ट्र सीमाभागात दुःखाची लाट पसरली आहे.

कोण होते संभाजी पाटील ?

संभाजी पाटील यांनी १९९० पासून बेळगावचे KingMaker म्हणून चार वेळा महानगरपालिकेचे विश्वविक्रमी महापौर म्हणून काम पाहिले. २९ वर्ष त्यांनी बेळगाव महापालिकेत मराठीभाषिकांचे प्रतिनिधित्व केले. २०१३ मध्ये बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ते आमदार म्हणून निवडून आले.

मराठी भाषिकांच्या प्रश्नांना कर्नाटक विधानसभेत त्यांनी वाचा फोडली. बेळगावचा पाणीप्रश्न त्यांच्यामुळे मिटला. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाप्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी त्यांनी १९९६ मध्ये दिल्लीत आंदोलन केले होते. कोर्टातील सीमाप्रश्नावर त्यांचे जातीने लक्ष असायचे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या मुलाचे रेल्वेतून पडून निधन झाले होते.

मराठी भाषिकांवरील अन्याय

१ नोव्हेंबर १९५६ ला भाषावार प्रांतरचना होऊन म्हैसूर म्हणजेच कर्नाटक राज्याची निर्मिती झाली. परंतु त्यावेळी लोकमताचा आदर न करता बेळगाव आणि आसपासचा मराठीभाषिक प्रदेश कर्नाटकात सामील करण्यात आला. या अन्यायाविरोधात गेली ६५ वर्ष तिथले मराठी भाषिक बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहेत.

त्यासाठी अनेक आंदोलने झाली ज्यात लोकांना तुरुंगवास किंवा हौताम्य मिळाले. अशामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या लोकांमध्ये आशेचा किरण दाखवण्याचे काम केले. कर्नाटक सरकारने मराठीभाषिकांचा आवाज दाबण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बेळगावात घेण्याच्या विरोधात “महाराष्ट्र एकीकरण समितीचे आणखी दोन आमदार निवडून आले असते तर कर्नाटक सरकारची अंत्ययात्रा काढली असती” असे जबरदस्त प्रत्युत्तर दिले होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *