उन्हाळ्याच्या दिवसात ही काळजी घेऊन वाढवा आपल्या बाईकचे मायलेज !

प्रत्येक बाईकस्वाराला आपल्या बाईकने कमी पेट्रोलमध्ये जात ऍव्हरेज द्यावे असे वाटत असते. पण त्यासाठी तशी बाईकची काळजीही घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या बाईकची काळजी घेऊन तिचे ऍव्हरेज कसे वाढवायचे याबद्दल काही टिप्स देत आहे.

१) गाडी सावलीत लावा –

गाडीमधील पेट्रोल हे ज्वलनशील इंधन असल्याने त्याला उष्णता मिळाली की काही प्रमाणात त्याची वाफ होऊन ते उडून जाते. गाडी बऱ्याच काळापर्यंत उन्हात राहिल्यास इंधनासोबतच गाडीचेही नुकसान होते. शक्यतो गाडी सावलीतच लावत जा.

२) गाडीवरचा अतिरिक्त भार कमी करा

गाडीवर जितका अधिक भार असेल तितका गाडीच्या इंजिनावर लोड येतो. त्यामुळे साहजिकच इंधनही तेवढ्या जास्त प्रमाणात लागते. यावर उपाय म्हणून आपल्या गाडीवर असणारा अतिरिक्त भार कमी करा. डिक्कीत कमीत कमी वजन ठेवा. गाडीवर जितके कमी वजन असेल तितके जास्त ऍव्हरेज मिळेल.

३) गाडीच्या चैनची काळजी घ्या

गाडीच्या चैनला नियमितपणे ऑइल किंवा ग्रेस उपचार करत जा. चैन कधीच कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या. चैन कोरडी पडली की ती गंजते किंवा घर्षण वाढते. त्यामुळे गाडीचे ऍव्हरेज कमी होते.

४) गाडीचा फिल्टर स्वच्छ ठेवा

उन्हाळ्याच्या दिवासात तसेच धुळीने किंवा धुरामुळे गाडीच्या फिल्टरवर परिणाम होतो. ते खराब होतात. त्यामुळे इंजिनाला बाहेरची स्वच्छ हवा मिळत नाही. अशी हवा न मिळाल्याने इंजिनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि गाडीचे ऍव्हरेज कमी होते. त्यासाठी नियमित फिल्टर बदलत जा.

५) चाकात योग्य प्रमाणात हवा ठेवा

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे चाकातील हवेचा दाब बदलत असतो. चाकातील हवेचा दाब कमी झाला तर त्यामुळे गाडीला कमी ऍव्हरेज मिळते. त्यासाठी योग्य प्रमाणात चाकातील हवेची स्थिती असणे आवश्यक आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *