हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढरे बेडशीट का वापरले जातात ?

काही कामानिमित्त किंवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर उशीर झाल्यास अनेकदा आपल्याला रात्री मुक्काम करावा लागतो. अशावेळी आपण एखाद्या हॉटेलचा पर्याय निवडतो. हॉटेलात गेलो असता निटनिटकेपणाने सजवलेली रुम दिसेल. बेडवर आपल्याला पांढऱ्या रंगाचे बेडशीट अंथरलेले बघायला मिळते. पण आपण कधी हा विचार केला का, की हॉटेलच्या रुममधील बेडवरती पांढरेच बेडशीट का असते ? चला तर जाणून घेऊया यामागे काय आहे कारण…

पांढरे बेडशीट दाखवते स्वच्छता

हॉटेलमध्ये मुक्काम करणारा प्रत्येक ग्राहक तिथल्या स्वच्छतेला सर्वाधिक महत्व देतो. त्याला असं वाटत असतं की मी कितीही घाण करणारा असलो तरी मला रुम मात्र स्वच्छच हवी. खोलीमध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीट अंथरण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे ते हॉटेलमधील स्वच्छता निर्देशित करतात. त्या स्वच्छताकडे पाहूनच आलेले ग्राहक रुम स्वच्छ असल्याचा अंदाज लावतात आणि झटक्यात ती रूम बुक करतात.

ग्राहक स्वच्छेतेच्या बाबतीत सजग होतो

पांढऱ्याशुभ्र बेडशीटची खासियत अशी आहे की इतक्या स्वच्छ कापडावर ग्राहक खाण्यापिण्याच्या गोष्टी सांडणार नाहीत याची काळजी घेतो. हा एक मानसशास्त्रीय प्रभाव असतो. ग्राहक त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत सजग होतो.

ब्लिच करणे सोपे असते

शुभ्र कापडांवर ब्लिच करणे सोपे असते. ब्लिच केल्यामुळे कपडे चमकदार दिसतात. हॉटेलमधील बेडशीट जास्त मळत नसल्याने त्यांना ब्लिचही कमी लागते आणि ते जास्त काळ चांगले राहतात.

ग्राहकाला आरामदायक वाटते

शुभ्र रंग मनाला शांती देतो. त्यामुळेच आलेल्या ग्राहकाला आरामदायक वाटावे आणि त्याला शांती मिळावी हे सुद्धा एक कारण त्यामागे आहे. जर आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *