या आहेत दुश्मनाचा थरकाप उडवणाऱ्या ७ भारतीय कमांडो फोर्सेस

साधारण सैनिकांपेक्षा कमांडो फोर्स विशेष मोहिमांसाठी तयार केल्या जातात. त्यांची ट्रेनिंग खूप खडतर असते. भारतातील अनेक कमांडो फोर्सेस त्यांच्या क्षमतेसाठी जगात प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया अशा कंन्डो फोर्सेसबद्दल…

१) पॅरा कमांडोज – भारतीय सेनेचे सर्वात प्रशिक्षित कमांडो या फोर्समध्ये असतात. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात स्थापित झालेल्या पॅरा कमांडो फोर्सने १९७१ आणि १९९९ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती. २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक पॅरा कमांडोनेच केली होती. ३००० फूट उंचावरूनही हवेत उडी मारण्यात कुशल असणाऱ्या या फोर्सने देशविदेशात अनेक मोहीम यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

२) मार्कोस – इंडियन नेव्हीची मार्कोस ही विशेष फोर्स अमेरिकेच्या सील कमांडोनंतर जगातील एकमेव अशी फोर्स आहे, जी सशस्त्रपणे पाण्यामधील मोहिमा यशस्वीपणे पार पाडू शकते. तिची स्थापना १९८७ मध्ये झाली असून भारतात जवळपास १२०० मार्कोस कमांडो आहेत.

३) गरुड कमांडो – भारतीय वायुसेनेच्या विशेष फोर्सचा हिस्सा असणाऱ्या गरुड कमांडो फोर्समध्ये अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असणारे जवळपास २००० कमांडो आहेत. आकाशातील मोहिमा पार पाडण्यात ते तरबेज आहेत. एअर स्ट्राईक, विशेष लढाई आणि बचाव मोहिमांसाठी त्यांना खास ट्रेनिंग दिली आते.

४) घातक – असं सांगितले जाते की घातक फोर्सचे कमांडो इतके ताकतवान असतात की एक कमांडो शत्रूच्या २० सैनिकांना पुरून उरतो. युद्धाच्या वेळी बटालियनच्या समोर चालणारी घातक फोर्स तोफखाने नष्ट करण्यात तरबेज आहे. त्यांना जवळून केल्या जाणाऱ्या मनुष्यहल्ल्यांची ट्रेनिंग दिली जाते.

५) राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) – देशांतर्गत दहशतवादी हल्ले आणि आणिबाणीसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी एनएसजी किंवा ब्लॅक कॅट कमांडो फोर्स काम करते. १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लु स्टार नंतर या फोर्सची स्थापना करण्यात आली होती.

६) स्पेशल प्रोटेक्शन फोर्स – प्रधानमंत्री राजीव गांधींच्या खुनानंतर देशातील महत्वाच्या नेत्यांना संरक्षण देण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची स्थापना करण्यात आली. यांचे मुख्य काम हे प्रधानमंत्री आणि माजी प्रधानमंत्री तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करणे हे आहे.

७) कोब्रा – गोरिल्ला तंत्राने युद्ध करण्यासाठी २००८ मध्ये कोब्रा या पॅरामिलिटरी फोर्सची स्थापना करण्यात आली होती. भारताच्या नक्षलप्रभावित भागात ही फोर्स आपली सेवा देते. जगातील सर्वोत्कृष्ट पॅरामिलिट्री फोर्समध्ये तिची गणना केली जाते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *