एखाद्या महालाप्रमाणे आहे क्रिस गेलचे घर, असा जगतो आयुष्य..

३९ वर्ष वय असणाऱ्या वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलला झटपट क्रिकेटचा बादशाह म्हणले जाते. त्याच्या विस्फोटक बॅटिंगपुढे कुठल्याच बॉलरचा निभाव लागत नाही. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १२००० हुन अधिक धावा बनवल्या असून त्यात २१ शतकांचा समावेश आहे.

वेस्टइंडीज शिवाय ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर बेंगलोर, किंग्स ११ पंजाब, लाहोर कलंदर्स, ढाका ग्लॅडिएटर्स, जमैका तलावाह, मेलबर्न रेनेगेड्स, कराची किंग्स आणि सिडनी थंडर अशा संघांकडून खेळण्यासाठी ख्रिस गेलला चांगले मानधन मिळते. गेल नुसत्या आयपीएलमधून वर्षाला १० ते १२ कोटी रुपये कमावतो. जाणून घेऊया ख्रिस गेलं बद्दल…

कचरा गोळा करणारा ख्रिस गेल संघर्षावर मात करुन बनला २५० कोटींचा मालक

ख्रिस गेलचे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. त्याचे कुटुंब कच्च्या झोपडीत राहायचे. गेलचे वडील साधे पोलीस होते तर आई कॉलनीत खारे शेंगदाणे विकायची. गरिबीमुळे गेलला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने जागोजागी कचरा गोळा करण्याचेही काम केले होते असे एका मुलाखतीत सांगितले होते.

मात्र गेलने आपल्या अंगभूत कौशल्याने क्रिकेटमध्ये चांगलेच नाव कमवले. News Americas Now च्या २७ सप्टेंबर २०१८ च्या बातमीनुसार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी ख्रिस गेलने आतापर्यंत २० लाख किमीहुन अधिक प्रवास केला आहे. २०१८ पर्यंत त्याची एकूण संपत्ती २५० कोटी असल्याचे सांगण्यात आले होते.

असा आहे ख्रिस गेलचा बंगला !

जमैका मध्ये जन्मलेल्या ख्रिस गेलने जमैकामध्येच एक बंगला विकत घेतला ज्याची किंमत किंमत ५० कोटींहून अधिक आहे.आपल्या बंगल्याला त्याने CG333 असे नाव दिले असून यातील CG म्हणजे ख्रिस गेल आणि 333 हा त्याचा आवडता जर्सी नंबर आहे. अनेक सुविधांनी युक्त असणारा हा बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाही. या बंगल्याच्या छतावर स्विमिंग पुल आहे. त्याच्या बेडरूमचे छत काचेचे आहे.

गेलने आपल्या बंगल्यात पार्टी आणि मौजमजा करण्यासाठी एक “स्ट्रीप क्लब” बनवला आहे. त्याच्याकडे मर्सिडीज आणि लँडक्रुझर कार आणि हार्ली डेव्हिडसन बाईक आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *