परीक्षेत नापास झाले म्हणून निराश होणाऱ्यांनी या IAS अधिकाऱ्याचे शब्द डोळ्यासमोर ठेवावेत !

मागच्या काही दिवसात CBSE आणि ICSE सोबतच अनेक राज्यातील बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत. सोशल मीडियावर अभिनंदनाचे फोटोही झळकले. मात्र छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने बोर्डाच्या परीक्षेत नापास आत्महत्या केली.

या बातमीने दुखी झालेल्या २००९ च्या बॅचचे IAS अधिकारी आणि छत्तीसगडच्या कबिरधामचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार शरण यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून परीक्षांच्या निकालावरून निराश होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक मार्मिक संदेश दिला आहे.

काय सांगत आहेत IAS अविनाश कुमार शरण ?

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, “आज मी एका वर्तमानपत्रातील दुःखद बातमी वाचली की एका विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये मनासारखे मार्क पडले नाहीत म्हणून आत्महत्या केली. मी अशा सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करतो की परीक्षांच्या निकालांना एवढे महत्व देऊ नका. तो केवळ आकड्यांचा खेळ आहे. तुम्हाला भविष्यात अशा कितीतरी संधी मिळतील जिथे तुम्ही तुमचे कर्तृत्व सिद्ध करू शकता.

अविनाश कुमार शरण यांना बोर्डाच्या परीक्षेत होते अत्यंत कमी मार्क

कमी मार्क पडल्यामुळे निराश होणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अविनाश कुमार शरण यांनी आपले स्वतःचे उदाहरण ठेवले आहे. अविनाश यांना दहावीच्या परीक्षेत केवळ ४४.५०% तर बारावीच्या परीक्षेत ६५%मार्क होते. त्यांना ग्रॅज्युएशनला ६०%च मार्क होते. एवढे असतानाही ते अत्यंत अवघड मानली जाणारी UPSC परीक्षा पास झाले आणि आज एक IAS म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत. परीक्षांमधील मार्क म्हणजे शेवटचा मार्ग नसतो. वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळत असतात.

तुम्हाला हि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *