चीन अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का खेळत नाही, क्रिकेटप्रेमींनी काळजावर दगड ठेवून वाचा कारणे !

टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चीन जगात अनेक देशांच्या पुढे आहे. जागतिक खेळांमध्ये चीनचे नाव सातत्याने चमकते पण क्रिकेटच्या बाबतीत हा देश खूप मागे आहे. चीनच्या शेजारी असणाऱ्या भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान देशात मात्र क्रिकेट हा आवडीचा खेळ आहे. मात्र चीन देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि इथल्या लोकांनाही क्रिकेट हा खेळ आवडत नाही. यामागे काय कारण असेल ? चला तर जाणून घेऊया यामागची तीन कारणे…

पहिले कारण

चीन हा देश पहिल्यापासून ऑलम्पिक खेळांचे समर्थन करत आला आहे. प्रत्येक ऑलम्पिकसाठी चीन प्रचंड मेहनत घेतो. ऑलम्पिकच्या तक्त्यावर लक्ष टाकले की आपल्याला दिसून येईल चीनचे ऑलम्पिकमधील प्रदर्शन किती चांगले आहे आणि त्यांचे खेळाडू मोठ्या संख्येने मेडलही जिंकत आहेत. क्रिकेट हा खेळ ऑलम्पिकचा हिस्सा नाही. बहुतेक त्यामुळेच चीन क्रिकेटला जास्त महत्व देत नाही. हे जरी असले तरी चीन आशियाई क्रिकेट कौन्सिलचा सदस्य आहे.

दुसरे कारण

सर्वसाधारणपणे आपण पाहिले तर ब्रिटिशांनी जिथे जिथे वसाहत स्थापन केल्या तिथे ब्रिटिश सैनिक क्रिकेट खेळ सोडून आल्याचे आपल्याला लक्षात येईल. परंतु ब्रिटिशांनी चीनमध्ये कधीही वसाहत केली नाही. क्रिकेट हा भांडवलदारांचा खेळ असल्याने साम्यवादी चीनमध्ये क्रिकेट खेळ रुजला नाही. मात्र बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनीस यासारख्या खेळात चीनने जगातील इतर अनेक देशांना मागे टाकत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

तिसरे कारण

तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा जागतिक खेळ नाही. जगातील १९५ पैकी मोजक्याच म्हणजे अवघ्या १०-१२ देशात क्रिकेट खेळला जातो. क्रिकेटला अल्पसंख्यांक खेळ मानले जाते. क्रिकेट मधील स्टार खेळाडूंना इंटरनॅशनल आयकॉन मानले जात नाही. चीन हा खेळाच्या माध्यमातून जगात आपली छाप सोडण्यासाठी झटणारा देश आहे. क्रिकेट मधील स्टार खेळाडूंना इंटरनॅशनल आयकॉन मानले जात नाही. कदाचित त्यामुळेच चीनमधील लोकांना क्रिकेट खेळामध्ये जास्त रस नाही.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *