आजच्याच दिवशी पहिल्यांदा प्रधानमंत्री बनले होते अटलबिहारी वाजपेयी !

अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकीय पटलावरील असे नाव आहे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने न केवळ व्यापक सन्मान मिळवला होता, सोबत अनेक अडचणींना तोंड देऊन नव्वदच्या दशकात भाजपला रुजवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. हा वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाचाच करिश्मा होता ज्यामुळे भाजपसोबत त्यावेळी नवनवीन मित्रपक्ष जोडले गेले. देशात हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आणि तिच्याकडे जगाचे वेधण्यासाठी सर्वात जास्त काम कुणी केलं असेल तर ते आहेत माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी !

कम्युनिस्ट ते हिंदुत्ववादी प्रवास आणि नंतर १२ वेळा खासदार

सुरुवातीच्या काळात अटलबिहारी कम्युनिस्ट विचारधारेचे होते. नंतर आरएसएसचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी हिंदुत्ववाद स्वीकारला. आरएसएसचा पेपर चालवण्यासाठी त्यांनी आपले कायद्याचे शिक्षणही सोडले. १९४२-४५ दरम्यान छोडो भारत चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. १९५५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. त्यानंतर १९५७ मध्ये ते खासदार बनले. अटलजी आतापर्यंत लोकसभेत १० वेळा आणि राज्यसभेत २ वेळा खासदार राहिले आहेत.

४० वर्ष विरोधी पक्षात राहून अटलजी बनले प्रधानमंत्री

१९५७ मध्ये खासदार बनल्यापासून ४० वर्ष अटलजी विरोधी पक्षाच्या बाकावर बसले. १६ मे १९९६ रोजी अटलजी पहिल्यांदा प्रधानमंत्री बनले. मात्र आकड्यांच्या खेळात बहुमत सिद्ध करता न आल्याने १३ दिवसात त्यांचे सरकार पडले. त्यांनतर १९९९ मध्ये दुसऱ्यांदा प्रधानमंत्री अटलजींचे १३ महिन्यांचे सरकार कोसळले. पुढे १९९९ च्या निवडणुकात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन होऊन अटलजी प्रधानमंत्री बनले आणि त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *