पिवळ्या साडीवाली नंतर आता निळ्या साडीवाल्या मतदान अधिकाऱ्याचेही मनोगत वाचा

मागच्या आठवड्यात रीना द्विवेदी नावाच्या लखनऊ येथे राहणाऱ्या आणि पिवळी साडी घालून निवडणूक ड्युटीवर जाणाऱ्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता सहाव्या टप्प्यातील निवडणुकीत भोपाळ येथे निळी साडी घालून मतदान अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महिलेचेही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पिवळ्या साडीवाली नंतर निळ्या साडीवाल्या महिलेनेही मतदान अधिकाऱ्याने याबाबतीत आपले म्हणने सांगितले आहे. जाणून घेऊया त्या महिलेचेबद्दल…

कोण आहे आहे ती महिला ?

निळी साडीवाल्या महिला मतदान अधिकाऱ्याचे नाव योगेश्वरी गोहिते ओंकार असे असून त्या मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहतात. तिथे त्या कॅनरा बँकेच्या कुंजननगर शाखेत प्रोव्हिजनरी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचे पती भारतीय सेनेत मेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या घरी मुलगा रोमिला आणि सासू असते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत त्या महिलेचं काय म्हणणं आहे ?

योगेश्वरी यांनी सांगितले की, ” हे फोटो घेतले तेव्हा मी काम करत होते. मला आनंद आहे की आपल्याला आपल्या कामावरून ओळखले जात आहे. मी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहते.” पुढे तिने सांगितले की, “बाकी पुरुष असताना निवडणुकीत बँकेकडून माझीच ड्युटी लागली होती. भोपाळच्या गोविंदपुरा आयटीआय बूथ नंबर १०० मध्ये माझी ड्युटी लागली होती. त्यावेळी मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाताना माझा फोटो काढण्यात आला होता. लोकशाहीच्या या उत्सवात योगदान देताना मला आनंद वाटला.”

आपल्या सौंदर्याबद्दल काय म्हणाल्या योगेश्वरी ?

सोशल मीडियावर योगेश्वरीच्या फोटोवर येणाऱ्या त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करणाऱ्या कमेंटबद्दल विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, “प्रोफेशनल असतानाही स्वतःला फिट राखणे काही अवघड काम नाही. मी माझ्या परिवारासोबत स्वतःकडंही लक्ष देते. मी फिट राहण्यासाठी योगा, सायकलिंग,रनिंग करते. यामुळे वर्कआऊटही होते आणि मी फिटही राहते. लोकांनाही मी हेच सांगू इच्छिते की स्वतःची काळजी घेऊन फिट रहा.”

आपल्याला हि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *