गुडघ्यातून रक्त येत असतानाही दुखरा पाय घेऊन शेवटपर्यंत जिद्दीने खेळला शेन वॉटसन !

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात चेन्नईचा शेन वॉटसन मैदानावर असेपर्यंत मुंबईचे समर्थक काळजीत होते. परंतु वॉट्सन रनआऊट झाला आणि मुंबईच्या समर्थकांनी मैदानावर एकच जल्लोष केला. शेवटच्या चेंडूवर विकेट घेऊन मुंबईने विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र या सगळ्यांमध्ये जिद्दीने चेन्नईच्या विजयासाठी लढणाऱ्या शेन वॉट्सनचेही क्रिकेटप्रेमी म्हणून आपण कौतुक करायला हवे. गुडघ्यातून येत असतानाही वॉट्सन जिद्दीने लढत होता.

हरभजनसिंगने केला दुखापतीचा वॉटसनच्या खुलासा

हरभजन सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन वॉटसनच्या दुखापतीची बातमी शेअर केली. त्यात त्याने म्हटले की, “शेन वॉटसनने संघासाठी घाम, रक्त आणि सर्वकाही दिले आहे. आमच्या भावाचा आम्हाला आदर आहे.” त्याने दिलेल्या माहितीनुसार वॉटसन जेव्हा मैदानाबाहेर आला तेव्हा त्याची ट्राउझर रक्ताने लाल झाली होती. वॉटसनवर त्वरित उपचार करण्यात आले. त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला ६ टाके घालण्यात आले.

गुडघ्याच्या दुखण्यावर संघर्ष करता करता वॉटसन झाला रनआऊट

चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी ३ बॉलमध्ये ५ धावांची आवश्यकता असताना वॉटसन दुसरी रन घेताना रनआऊट झाला. त्यावेळी सर्व स्टेडियम सुन्न झाले. खरं तर गुडघ्याच्या दुखापतीमुळेच तो रनआऊट झाला.

मात्र प्रेक्षकांमधील कुणालाही कल्पना नव्हती चेन्नई सुपर किंग्सचा हा जिद्दी खेळाडू त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्यातून रक्त निघत असतानाही दुखण्याची पर्वा न करता आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी लढत होता. वॉटसनने ओपनिंगला येऊन ५९ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८० धावांची अविस्मरणीय खेळी केली.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *