या आहेत आपल्या एकटीच्या हिंमतीवर मुलांचे पालनपोषण करणाऱ्या बॉलिवूडच्या १० माता

मुलांच्या चांगल्या पालनपोषणासाठी सर्वाधिक गरज असते ती एका आईची ! आईच अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांचे चांगल्या प्रकारे संगोपन करू शकते. मुलांवर चांगले संस्कार करू शकते. बॉलिवूड इंडस्ट्रीच्या बाबतीतही काही वेगळे नाही. बॉलिवूडमध्येही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वतःच्या एकटीच्या हिंमतीवर आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत. जाणून घेऊया अशा मातांबद्दल…

१) सुश्मिता सेन – बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन हिने लग्न न करता अनाथाश्रमातून २ मुली दत्तक घेतल्या आहेत. सुश्मिता आपल्या रिनी आणि आलिजा या मुलींचा चांगल्या प्रकारे सांभाळ करून आपली जबाबदारी पार पाडत आहे. तिने रिनीला २००० मध्ये आणि आलिजाला २०१० मध्ये दत्तक घेतले होते. आपल्या मुलींच्या चांगल्या संगोपनासाठी तिने आपले चित्रपट करिअरसुद्धा सोडले आहे. सुश्मिताच्या इंस्टाग्रामवर तिच्या मुलींसोबतचे फोटो पाहायला मिळतात.

२) करिश्मा कपूर – पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीनेच केला आहे. तिचे म्हणणे आहे की मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिला इतर कुणाची गरज नाही. इंस्टाग्रामवरील करिश्माचे मुलांसोबतचे फोटो पाहून ती आपल्या मुलांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करत असल्याचे दिसते.

३) नीना गुप्ता – बॉलिवूड अभिनेत्रीने अविवाहित असतानाही समाजाचा विरोध पत्करुन आपला प्रेमी आणि वेस्टइंडीजचा माजी क्रिकेट कर्णधार विवियन रिचर्ड्स यांनी आपल्या मसाबा नावाच्या मुलीला जन्म दिला. यामुळे बॉलिवूडमध्ये तिची प्रतिमा दमदार अभिनेत्री अशी झाली होती. आज नीना गुप्ताची मुलगी मसीबा फॅशन दुनियेतील नामांकित व्यक्तिमत्व आहे.

४) कोंकणा सेन – खूप कमी लोकांना माहित आहे की बॉलिवूड अभिनेत्री अपर्णा सेन यांची मुलगी कोंकणा सेन सुद्धा एक सिंगल मदर आहे. गरोदर असतानाच अभिनेता रणवीर शौरीसोबत तिचा घटस्फोट झाला. त्यांनतरही तिने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात काम करणयाऐवजी आपल्या हारुन शौरी नावाच्या मुलाचे चांगले संगोपन करण्याला तिने महत्व दिले आहे.

५) अमृता सिंह – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंह हिने सुद्धा आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीनेच केला आहे. त्यांची मुलगी सारा अली खान सुद्धा चित्रपटात काम करत आहे.

६) डिम्पल कपाडिया – डिम्पलने खूप कमी वयात राजेश खन्नासोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिने चित्रपट काम करणे बंद केले. त्यांना ट्विंकल आणि रिंकी अशा दोन मुली झाल्या. राजेश खन्नासोबत घटस्फोट झाल्यानंतर तीने परत चित्रपटात काम करायला सुरु केले. आपल्या दोन्ही मुलींचे संगोपन तिने एकटीने केले.

७) नीलिमा अजीम – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर याची आई आणि पंकज कुमारांची पत्नी नीलिमा अजीम यांना आजच्या जमान्यातील लोक जास्त ओळखत नाहीत. पंकज कुमारांसोबत घटस्फोट झाल्यानंतर नीलिमाने शाहिदचा चांगला सांभाळ केला. नंतर त्यांनी अभिनेता राजेश खट्टर यांच्याशी विवाह केला होता.

८) पूनम ढिल्लो – नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो हिने अशोक ठाकरिया यांच्याशी लग्न केले होते. पुढे त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी आपल्या पालोमा नावाची मुलगी आणि अनमोल नावाच्या मुलाचा उत्तमरीत्या सांभाळ केला.

९) सारिका – बॉलिवूड अभिनेत्री सारिकाने कमळ हसन यांच्यासोबत विवाह केला होता. घटस्फोट झाल्यानंतर आपल्या श्रुती हसन आणि अक्षरा हसन नावाच्या मुलींचा तिने एकटीने चांगला सांभाळ केला. ज्या पद्धतीने सारिकाने आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे केले ते पाहता तिचे कौतुक करायला लागेल.

१०) पूजा बेदी – अभिनेत्री आणि टिव्ही होस्ट पूजा बेदी यांनी फरहान इब्राहिम यांच्यासोबत लग्न केले होते. नंतर त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यांनतर आपल्या मुलांची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेउन तिने त्यांचे चांगले पालनपोषण केलं.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *