राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी दिला चोप

फेसबुकवरील “TV9 मराठी” वृत्तवाहिनीच्या एका न्यूजखाली सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असून बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. फेसबुकवर त्या तरुणाने सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट केली होती. झाल्या प्रकाराबद्दल त्या तरुणाने माफी मागितली आहे.

काय आहे प्रकरण ?

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या पुण्यातील डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमासाठी आल्या असताना TV9 मराठी वाहिनीच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुळे बोलल्या की, “निवडणुकीत पारदर्शकता हवी असेल तर ईव्हीएम मशिन्स नकोच ही आमच्या पक्षाची भूमिका आहे” अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या बातमीची न्यूज TV9 मराठीच्या फेसबुक पेजवर टाकली होती. त्या बातमीखाली कोल्हापूरच्या एका तरुणाने सुप्रिया सुळेंना उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह कमेंट केली होती.

राष्ट्रवादी समर्थकांनी दिला चोप

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी थेट या विषयी समजताच त्या तरुणाच्या घरी जाऊन घरच्या लोकांसमोर त्याला चोप दिला व समज दिला. आपल्याकडून झालेल्या चुकीची लेखी माफी मागितल्यावर कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला सोडून दिले आणि त्याच्या पालकांना मुलावर लक्ष देण्याची विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार तो युवक उच्चशिक्षित आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *