पदावर असताना या चारच राष्ट्रपतींनी केलं आहे मतदान!

सध्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे. वेगवेगळ्या नेत्यांचे मतदान करतानाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत.

आपणही आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन आपले मतदान केल्याचे फोटो शेअर केले असतील. पण आपण कधी राष्ट्रपतींनी मतदान केल्याचा फोटो पाहिला आहे का ? जाणून घेऊया आतापर्यंत कोणकोणत्या राष्ट्रपतींनी मतदान केले आहे.

रामनाथ कोविंद यांनी केले मतदान

भारताच्या इतिहासात बहुतांश राष्ट्रपतींनी मतदानात कधी भागच घेतला नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही मतदान केले आहे. राष्ट्रपतींना मतदानासाठी राष्ट्रपती भवनातच विशेष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. पदावर राहून मतदान करणाऱ्या मोजक्या राष्ट्रपतींच्या यादीत विद्यमान राष्ट्रेपती रामनाथ कोविंद यांनी स्थान मिळवले आहे.

आतापर्यंत कोणकोणत्या राष्ट्रपतींनी पदावर राहून केले मतदान ?

१९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी मतदान केले. पदावर राहून मतदान करणारे ते पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी मतदान केंद्राबाहेर रांगेत उभा राहून मतदान केले. त्यांच्यानंतर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनीही पदावर असताना राष्ट्रपती भवनात विशेष मतदान केंद्रावर मतदान केले.

२०१२ मध्ये राष्ट्रपती बनलेल्या प्रणव मुखर्जींनी मात्र देशातील राष्ट्रपतींनी मतदान न करण्याची जी परंपरा आहे ती सुरु करत मतदान न कारण्याचा निर्णय घेतला. रामनाथ कोविंद हे पदावर राहून मतदान करणारे चौथे राष्ट्रपती बनले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *